टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:26 PM2018-04-16T16:26:08+5:302018-04-16T16:26:08+5:30

एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो.

House cooling from waste products | टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा

टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा

googlenewsNext
ठळक मुद्देटाकाऊ वस्तूंपासून घरात गारवा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न

पुणे : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने घरातही उकाडा असह्य होऊ लागला आहे. कूलर, एसी, फॅनचा वापर करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. भारनियमनामुळे अचानक लाईट गेले तर काय करणार? शिवाय, विजेचे वाढते बिलही काळजाचा ठोका चुकवते. यावर पर्याय म्हणून एका पुणेकर अवलियाने घराचे तापमान कमी करण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे.अचानक लाईट गेले तर काय करणार? शिवाय, विजेचे वाढते बिलही काळजाचा ठोका चुकवते. यावर पर्याय म्हणून एका पुणेकर अवलियाने घराचे तापमान कमी करण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे.
एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो. यावर उपाय म्हणून कोथरुडमधील उमेश दारवटकर यांनी टाकाऊ वस्तूंपासून घरात गारवा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
जुनी वापरलेली पोती, इतरांनी वापरुन फेकून दिलेले थर्माकोलचे शीठ आणि ठिबक सिंचनाचा वापर करुन दारवटकर यांनी घराचे वातावरण ४-५ अंश सेल्सियशने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरचे वातावरण अंशाअंशाने वाढत असताना, घरातील तापमान १९-२० अंश सेल्सियश कमी करण्यात यश आले आहे.
दारवटकर यांनी मार्केट यार्डमधून कमी दराने मिळणारी पोती विकत घेतली. ही पोती त्यांनी एकमेकांना शिवून भिंतीवर आणि टेरेसवर लावली आहेत. थर्माकोलच्या शीटमधून रबरी नळीच्या सहाय्याने पाणी पोत्यांवर पडत राहते. त्यामुळे पोती आणि पर्यायाने भिंती कायम थंड राहतात. त्याचाच परिणाम म्हणून घरात कायम गारवा राखून ठेवण्यास मदत मिळते. 
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना दारवटकर म्हणाले, ‘मी गेल्या तीन वर्षांपासून दर वर्षी उन्हाळयात अशा प्रकारचे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. घराच्या आजूबाजूला खूप झाडे असल्याने त्यांची पाने पडून कचरा आणि पालापाचोळा होत असे. सुरुवातीला पालापाचोळा एकत्र करुन तो पोत्यात भरुनही पोती गच्चीवर पसरली होती. या पोत्यांवर पाणी मारल्याने टेरेसवर थंडावा पसरत होता. मात्र, पाणी मारल्यानंतर पालापाचोळा भिजून त्यास वास येत असे. त्यानंतर पोती आणि थर्माकोल यांचा पर्याय सुचला.’ मित्रमंडळी, नातेवाईकांनाही असे उपाय सातत्याने सुचवण्यासाठी ते पुढाकार घेतात.
आपल्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी, वस्तू आपण विनाकारण फेकून देतो. बारकाईने विचार केल्यास साध्या-सोप्या उपायांनी टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करता येतो. नव्या पिढीला टाकाउपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे महत्व समजल्यास भविष्यात फायदा होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

Web Title: House cooling from waste products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.