झाडाच्या कैऱ्या तोडल्याने लाकडी दांडक्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 07:53 PM2018-05-03T19:53:04+5:302018-05-03T19:53:04+5:30

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याने शेतकऱ्याने लाकडी दांडा आणि कु-हाडीने मारहाण केल्याचा प्रकार मदनवाडी येथे घडला.

hitten people for breaking mango fruits on tree | झाडाच्या कैऱ्या तोडल्याने लाकडी दांडक्याने मारहाण

झाडाच्या कैऱ्या तोडल्याने लाकडी दांडक्याने मारहाण

Next
ठळक मुद्देतोडलेल्या कैऱ्याचे पैसे चुकते करण्याची तयारी जाधव यांनी दर्शवली.

भिगवण : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याने शेतकऱ्याने लाकडी दांडा आणि कु-हाडीने मारहाण केल्याचा प्रकार मदनवाडी येथे घडला. तर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या मामालाही डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
याप्रकरणी हनुमंत विठ्ठल देवकाते, सनी हनुमंत देवकाते, विठ्ठल गणपत देवकाते, मनोहर विठ्ठल देवकाते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मी मनोज पवार यांनी फिर्याद दिली आहे. भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटणहून भिगवण येथे नातेवाईकांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या विश्वास जाधव आणि त्यांची पत्नीला मारहाण करण्यात आली आहे. गर्भवती असलेल्या पत्नीने कैरी खाण्याची इच्छा व्यक्त केल्याने विश्वास यांनी बारामती भिगवण रस्त्याशेजारी असणाऱ्या देवकाते वस्तीवरील शेतातून काही कैऱ्या तोडल्या. यावेळी त्यांच्या सोबत असणारे नातेवाईक दुसऱ्या दुचाकीवर रस्त्याच्या कडेला थांबले होते.
कै-या तोडल्याचे समजताच देवकाते मुलासह घटनास्थळी आला. कैऱ्या तोडल्याचा जाब विचारीत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तर तोडलेल्या कैऱ्याचे पैसे चुकते करण्याची तयारी जाधव यांनी दर्शवली. मात्र, बेभान झालेल्या देवकाते मंडळींनी लाकडी दांडक्यासह कुऱ्हाड आणि स्टंपने मारहाण केल्याची माहिती फियार्दीने पोलीस ठाण्यात दिली. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांनी या प्रकरणी तातडीने सूत्रे हलवीत दोघांना अटक केल्याची माहिती दिली. 


 

Web Title: hitten people for breaking mango fruits on tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.