कोठडीतून आरोपींचे पलायन भोवले : गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:07 PM2018-10-23T12:07:44+5:302018-10-23T12:09:13+5:30

खेड पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींचे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले असून या प्रकरणी गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.   

guard commander suspended and departmental inquiry of three policemen due to negligence | कोठडीतून आरोपींचे पलायन भोवले : गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी 

कोठडीतून आरोपींचे पलायन भोवले : गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी 

Next

पुणे : खेड पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींचे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले असून या प्रकरणी गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.   

पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (दि.२२) रोजी पहाटे चारच्या सुमारास विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) या दोन आरोपींनी कोठडीच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून पोबारा केला.त्यावेळी  बंदोबस्तासाठी पोलीस असूनही आरोपी गज कसे तोडू शकले असा प्रश्न विचारला जात होता. या प्रकारामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर टीकाही करण्यात येत होती.अखेर या प्रकरणात  गार्ड कमांडर कैलास कड यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर इतर तीन कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Web Title: guard commander suspended and departmental inquiry of three policemen due to negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.