रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे अवयवदान या विषयावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ शॉर्ट फिल्म स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:09 PM2018-02-09T12:09:38+5:302018-02-09T12:13:04+5:30

अवयवदानाच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘‘ग्रीन कॉरिडॉर’’ ही शॉर्ट फिल्म (लघुपट) स्पर्धा आयोजिण्यात आली आहे.

'Green Corridor' Short Film Competition Organize by Ribirth NGO | रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे अवयवदान या विषयावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ शॉर्ट फिल्म स्पर्धा

रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे अवयवदान या विषयावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ शॉर्ट फिल्म स्पर्धा

Next
ठळक मुद्देफिल्म सादर करण्याची मुदत १५ मार्च, रविवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरणया स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून योगदान देण्यासाठी उत्सुक आहोत : आरती गोखले

पुणे : अवयवदानाच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘‘ग्रीन कॉरिडॉर’’ ही शॉर्ट फिल्म (लघुपट) स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. फिल्म सादर करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत असून या स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये होणार, अशी माहिती आरती गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राजेश शेट्टी, मिलिंद लेले आदी उपस्थित होते. 
‘ब्रेन डेड’ व्यक्तीचे अवयवदान करून मरणासन्न व्यक्तीला जीवनदान दिले जाऊ शकते. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानदेखील विकसित करण्यात आले आहे. परंतु अवयवदानासंदर्भात पुरेशी जनजागृती नसल्यामुळे वैद्यकीय प्रयत्नांना मर्यादा पडत आहेत. त्यामुळेच शॉर्ट फिल्मसारख्या माध्यमातून या विषयावर जनजागृती घडविण्यासाठी रिबर्थ संस्थेतर्फे या अभिनव आयोजन केले आहे. आजपर्यंत शॉर्ट फिल्मच्या माध्यमातूून अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळले आहेत. परंतु अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी शॉर्ट फिल्मचे माध्यम निवडण्याचा हा उपक्रम नक्कीच प्रभावी ठरणार आहे. त्यामुळेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून योगदान देण्यासाठी उत्सुक आहोत, असे आरती गोखले यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Green Corridor' Short Film Competition Organize by Ribirth NGO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.