'आरक्षण मुद्द्यावर सरकार वेळकाढूपणा करतेय'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:35 AM2018-07-27T02:35:14+5:302018-07-27T02:35:40+5:30

दत्तात्रय भरणे यांची इंदापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांशी चर्चा

'Government is making time for reservations' | 'आरक्षण मुद्द्यावर सरकार वेळकाढूपणा करतेय'

'आरक्षण मुद्द्यावर सरकार वेळकाढूपणा करतेय'

Next

बीजवडी : राज्यातील मराठा समाजाबरोबर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला भाजपा सरकारने आरक्षण देण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात चारही समाजाच्या हाती काहीच आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकभावनेची दखल घेऊन दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करावीत; तसेच लोकभावना लक्षात घेऊन मी माझ्या इंदापूर विधानसभा मतदार संघातील आमदारकीचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी (दि. २६) रोजी इंदापूरमधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ दोन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या युवा कार्यकर्त्यांसमोर केली; तसेच तासाभरात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठविण्याचा शब्द आंदोलकांना देऊन, त्यानुसार तसे पत्र त्यांनी बागडे यांच्याकडे पाठवूनही दिले.
इंदापूरमधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ दोन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचे युवा कार्यकर्ते बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. गुरुवारी सायंकाळी दत्तात्रय भरणे यांनी या आंदोलनास भेट दिली. त्यावेळी ते आंदोलकांसमवेत ठिय्या मांडून बसले नाहीत, तर त्यांनी विविध समाजाच्या आरक्षणाबाबत भाजपा सरकारने चालवलेल्या वेळकाढूपणाचा आक्रमक भाषेत समाचार घेऊन, त्याबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसची व स्वत:ची भूमिकाही स्पष्ट केली.
मराठा, धनगर, अल्पसंख्याक मुस्लिम आणि लिंगायत समाजातील अनेक कुटुंबे कनिष्ठ आर्थिक स्तरात आहेत. यासंदर्भात, काँग्रेस आघाडी सरकारने मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सत्तांतर व्हावे या एकमेव हेतूने भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बारामतीत सुरू असणाऱ्या धनगर समाजाच्या आंदोलनाच्या वेळी पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर आरक्षण देण्याची घोषणा केली होती. सत्तांतरानंतर त्याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला आहे.
आत्तापर्यंत अनेक कॅबिनेट बैठका झाल्या. मात्र, धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही. मराठा, धनगर, लिंगायत, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाने योग्य भूमिका घेतली नाही. न्यायालयात आवश्यक कागदपत्रे, पुरावे सादर केले नाहीत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज उभ्या महाराष्ट्रात आंदोलने होत आहेत. तरीदेखील शासनास जाग येत नाही. या परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे आपणास सयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे सरकारचा जाहीर निषेध करत आमदार भरणे यांनी राज्यातील व इंदापूर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.

धनगर समाज आरक्षण मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष
धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण लागू करू, असे सरकारने जाहीर केले नाही. आजपर्यंत अनेक कॅबिनेटच्या बैठका झाल्या. मात्र अद्याप लागू केले नाही. मध्यंतरी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनामध्ये उद्रके झाला होता. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. लोकांच्या भावना तीव्र होत असून, वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे; अन्यथा मराठा समाजाबरोबरच धनगर, लिंगायत आणि मुस्लिम सामाजाचा राज्यात मोठा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी

Web Title: 'Government is making time for reservations'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.