अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणार

By Admin | Published: October 2, 2014 12:08 AM2014-10-02T00:08:13+5:302014-10-02T00:08:13+5:30

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली घरे सुविधा नव्हे,

To get justice for the injustice of justice | अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणार

अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणार

googlenewsNext
पुणो : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली घरे सुविधा नव्हे, तर असुविधा देणारी असल्याने, अशा योजनांमध्ये अन्याय झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही कॅन्टोन्मेंट मतदार संघातील मनसेचे अधिकृत उमेदवार अजय तायडे यांनी आज येथे दिली. 
भवानी पेठेतील बाबाजान चौकातील मंजुळाबाई चाळीचे एसआरए योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात आले आहे; मात्र या योजनेचे काम निकृष्ट स्वरूपाचे झाले असल्याने, या ठिकाणच्या घरांमध्ये खेळती हवा; तसेच सूर्यप्रकाश येत नाही. या ठिकाणच्या घरांचे स्लॅबही गळू लागले आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी आजपासून विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची तायडे यांनी आज सकाळी भेट घेऊन, या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. वारंवार तक्रारी करून थकलेल्या या ठिकाणच्या रहिवाशांनी या वर्षी विधानसभेच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज सकाळपासून विधान भवनासमोर सुरेश कांबळे, शब्बीर शेख, नंदू भादगरे, चंद्रकांत शिंदे यांच्यासह रहिवाशांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
 
4एसआरए योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारतीकडे एसआरए प्राधिकरण, महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. 
4याबाबत नागारिकांनी वारंवार तक्रारी करूनही शहरातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार त्याकडे दुर्लक्ष करतात, ही दुर्दैवी बाब आहे. 
4त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, हा प्रश्न सोडविण्यास आपले प्राधान्य राहील. त्यासाठी लवकरच एसआरए, महापालिका प्रशासन यांची बैठक घेऊन आपण ही समस्या सोडवू, असे आश्वासन तायडे यांनी आंदोलकांना दिले.

 

Web Title: To get justice for the injustice of justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.