आणखी चार अधिकारी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:10 AM2017-11-22T01:10:25+5:302017-11-22T01:10:37+5:30

पुणे : कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल मुख्य अभियंत्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आणखी ३ ते ४ अधिकारी आहेत.

Four more officers are on the radar | आणखी चार अधिकारी रडारवर

आणखी चार अधिकारी रडारवर

Next

पुणे : कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल मुख्य अभियंत्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आणखी ३ ते ४ अधिकारी आहेत. लवकरच एका अधिकाºयाची उचलबांगडी केली जाणार असल्याचे संकेतही मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस ‘पीएमपी’ ढवळून निघणार असून, अधिकाºयांनाही धडकी भरली आहे.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कामकाजातील अनियमिततेवर बोट ठेवून कर्मचारी व अधिकाºयांना धारेवर धरले आहे. कामकाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांना उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. मात्र, मुख्य अभियंता म्हणून सुनील बुरसे यांना अपेक्षित बस मार्गावर आणता आल्या नाहीत. तसेच वरिष्ठांचे आदेशही पाळले नाहीत. या निष्काळजीपणामुळे पीएमपीचे मोठे आर्थिक नुकसानही झाले. या कारणांमुळे बुरसे यांना नुकतेच बडतर्फ करण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला. आता या रांगेत आणखी तीन ते चार अधिकारी असल्याचे खुद्द मुंढे यांनी पत्रकारांना सांगितले. या अधिकाºयांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू असून, आठवडाभरात एखाद्या अधिकाºयाची बडतर्फी केली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले. यामध्ये मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांसह आगारप्रमुख व इतर समकक्ष अधिकाºयांचा समावेश आहे.
मुंढे यांच्या पवित्र्यामुळे अधिकाºयांमधे खळबळ उडाली आहे. कामात कसूर करणाºया अधिकाºयांवर मुंढे यांची करडी नजर आहे. अध्यक्षपदी रुजू झाल्यापासून त्यांनी अनेक कर्मचारी व अधिकाºयांना विविध कारणांसाठी निलंबित केले आहे. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. हा धडाका अजूनही सुरूच आहे.
काही अधिकाºयांना बडतर्फही करण्यात आले होते. पण त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. तर
काही अधिकाºयांची पदावनती करण्यात आली. कामाच्या कार्यक्षेत्रातही अनेक वेळा बदल केले आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा रोषही पत्करावा लागला. मात्र, त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केलेला नाही.

Web Title: Four more officers are on the radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.