पादचारीपुलासाठी चार दिवस साेलापूर रस्ता राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 08:33 PM2018-08-04T20:33:09+5:302018-08-04T20:35:19+5:30

पादचारी पुलाच्या कामासाठी साेलापूर रस्ता चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात अाला अाहे.

Four days Salalpur road will be closed for the construction of pedestrians bridge | पादचारीपुलासाठी चार दिवस साेलापूर रस्ता राहणार बंद

पादचारीपुलासाठी चार दिवस साेलापूर रस्ता राहणार बंद

googlenewsNext

पुणे : आर्म फोर्स मेडिकल काँलेज ते रेसकोर्स दरम्यान पादचारी उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यात आले असल्याने भैरोबानाला ते मम्मादेवी चौकपर्यंत चा  साेलापूर रस्ता वाहतूकीस बंद ठेवण्यात आला आहे. 


    पुलाचे काम सुरु असताना हा रस्ता बंद करण्यात आला असून हडपसर, फातिमानगर च्या बाजुने स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनासाठी भैरोबानाला येथून वानवडी, वानवडी बाजार मधून कमांड हाँस्पिटल च्या रोडने मम्मादेवी चौकातून पुढे जावे. तसेच स्वारगेट, कँम्प भागातून फातिनगर व हडपसरकडे जाणाऱ्या वाहनासाठी मम्मादेवी चौकतून पुढे अर्जुन मार्गाने रेसकोर्स मुख्य गेट वरुन एम्प्रेस गार्डनच्या रस्त्याने बाहेर निघून भैरोबानाला येथे येऊन पुढे जाण्याचे नियोजन वानवडी वाहतूक शाखेकडून करण्यात आले असल्याचे वानवडी वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्र विभांनडिक यांनी सांगितले. पुणे कँन्टोमेंट हद्दीतून स्वारगेट व हडपसर कडे जाणारा मुख्य सोलापूर-पुणे रस्ता बंद असल्याने वाहकांची तारांबळ उडाली व त्यांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. 


    आर्म फोर्स मेडिकल काँलेज कडुन होत असलेल्या या पादचारी पुलाचे काम ७ तारेखेपर्यंत संपवण्यात येणार असुन त्यानंतर भैरोबानाला ते मम्मा देवी चौक रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाचा काही भाग बसवण्यात आला असून काम बंद झाल्यानंतर सायंकाळी उशिरा ५.३० मी. भैरोबानाला वरुन स्वारगेट कडे जाणारा रस्ता तात्पुरता खुला करण्यात आला, सकाळी पुन्हा काम सुरु होण्याअगोदर बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. 
 

Web Title: Four days Salalpur road will be closed for the construction of pedestrians bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.