दूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:10 AM2018-06-14T02:10:32+5:302018-06-14T02:10:32+5:30

केंद्राकडे पावडर निर्यातीवर २५ टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी १० टक्के अनुदानासाठी संमती दिली; मात्र आणखी अनुदान मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

 Follow up to the center for milk payer subsidy, Mahadev Jankar's information | दूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती

दूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती

Next

बारामती : केंद्राकडे पावडर निर्यातीवर २५ टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी १० टक्के अनुदानासाठी संमती दिली; मात्र आणखी अनुदान मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री जानकर म्हणाले, की जागतिक बाजारात दूध पावडरचे दर पडलेत हे खर आहे. ही परिस्थिती लगेच पूर्ववत होणार नाही. राज्य सरकार आजही आरेच्या माध्यमातून २७ रुपये दूधदर देत आहे. मात्र, आमची संकलन केंद्रे कमी आहेत. दुधाचे धोरण सध्या नाही. ते बनविण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. ७०-३०चा कायदा केल्यानंतर यावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
आघाडी सरकारच्या काळात सहकाराची चळवळ मोडीत काढण्यासाठी सरकाचे धोरण मोडीत काढण्यासाठी खासगीकरणाला चालना देण्यात आली. शेतकऱ्यांनी खासगी दूध संघांकडून पैसे जादा मिळत असल्याने दूध देण्याची भूमिका घेतली. सरकार २७ रुपये दर देत आहे, तर खासगी दूध संघ १६ रुपये दर देत आहेत. साखर सम्राटापेक्षा दूध सम्राटांची लॉबी बनली आहे. ७९ अ च्या कारवाईसंदर्भात दूध संघांना नोटीस देण्याचे धाडस प्रथमच दाखविले. दुधाबद्दल पैसे जास्त देण्याची भूमिका घेणारे घेणारे पहिलेच राज्य आहे. दुग्ध भागाकडे १३ हजार ५०० अधिकारी होते. ते केवळ ३५० उरले आहेत. त्यामुळे सर्व संघांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. उद्योजकांना यामध्ये सहभागी करून ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ धोरण राबविण्यात येत आहे.
राज्य सरकारची ७८ हजार टन पावडर पडून आहे. यामध्ये खासगी दूध संघाची पावडर वेगळी आहे. जागतिक बाजारात दूध पावडरचे दर ४६ टक्के घसरले आहेत. त्यामुळे गरोदर माता, आश्रमशाळा, शालेय पोषण आहार, आरोग्य केंद्रामधून अंडी, दूध दिल्यास पावडरचा मोठा प्रश्न मार्गी लागेल. येणाºया ‘कॅबिनेट’मध्ये निर्णय होणार आहे.
गेल्या दीड महिन्यात दुधाची भेसळ रोखण्यासाठी धाडी अमाप टाकल्या. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. बारामती, फलटण, माळशिरस येथे धाडी टाकल्या. त्यामुळे राज्यात ६ लाख भेसळयुक्त दुधावर बंदी आली. दुधभेसळ रोखण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे. हा कायदा आल्यानंतर खागसी दूध धंद्यांच्या दूधभेसळीला आळा बसेल. १ कोटी ३० लिटर दुधाचे दररोज उत्पादन होत आहे. राज्याचा पशुसंवर्धन विभाग देशात प्रथम क्रमांकावर आहे, असे जानकर म्हणाले.

...हे बारामतीकरांना चांगलं समजतं

पुण्यातील हल्लाबोल समारोपाप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणेरी पगडी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून हद्दपार करून यापुढे फुले पगडी वापरण्याचे आवाहन केले. याबाबत या वेळी जानकर म्हणाले, की महात्मा फुले हे आमचे आयडॉल आहेत. मात्र, त्यांच्या नावाचा वापर कधी करायचा आणि कधी नाही करायचा, हे बारामतीकरांना चांगलं समजतं.

बारामतीकरांना कोणती पगडी कधी
वापरायची, हे चांगलं माहीत असलं, तरी जनतेलाही तुम्हाला कोणती पगडी घालायची, हे चांगलं माहीत आहे. खºया अर्थाने जातीचे विष पेरण्याचे काम हे राष्ट्रवादीनेच केले आहे, असा टोला जानकर यांनी ज्येष्ठ नेते पवार यांना लगावला.

बारामती लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर

बारामती लोकसभा निवडणूक आपण लढवणार का आणि मागील वेळेएवढा प्रतिसाद आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री महादेव जानकर यांना विचारला. यावर जानकर यांनी, ‘‘मी तुम्हाला सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मी निवडूनच येणार आहे,’’ असे उत्तर दिले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून मंत्री जानकर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title:  Follow up to the center for milk payer subsidy, Mahadev Jankar's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.