मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी पाडण्यासाठी आज घेण्यात येणार पाच वेळा ब्लाॅक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 07:47 AM2018-01-31T07:47:51+5:302018-01-31T07:49:28+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा येथील डोंगरावरील दरडी पाडण्याकरिता बुधवार (31 जानेवारी) सकाळी 10 ते  दुपारी 3.15 वाजण्याच्या दरम्यान प्रत्येकी 15 मिनिटांचे चार व अर्धा तासाचा एक असे पाच ब्लाॅक घेण्यात येणार आहेत.

Five times the block will be held today on Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी पाडण्यासाठी आज घेण्यात येणार पाच वेळा ब्लाॅक 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी पाडण्यासाठी आज घेण्यात येणार पाच वेळा ब्लाॅक 

Next

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा येथील डोंगरावरील दरडी पाडण्याकरिता बुधवार (31 जानेवारी) सकाळी 10 ते  दुपारी 3.15 वाजण्याच्या दरम्यान प्रत्येकी 15 मिनिटांचे चार व अर्धा तासाचा एक असे पाच ब्लाॅक घेण्यात येणार आहेत. यादरम्यान,  मुंबई व पुणे या दोन्ही लेनवरील वाहतूक थांबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सदरचे काम करण्यासाठीची अभियांत्रिक तयारी पूर्ण झाली असून महामार्ग पोलिसांनी देखील ब्लाॅककरिता परवानगी दिली असल्याने बुधवारी दिवसभर द्रुतगती मार्गावर दरडी पाडण्याचे सुरू राहणार आहे. या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करुनच प्रवास करावा व यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन करण्य‍ात आले आहे.

या वेळांमध्ये घेण्यात येणार ब्लॉक

सकाळी 10 वाजता ते  10.15 वाजेदरम्यान

सकाळी 11 वाजता ते  11.15 वाजेदरम्यान

दुपारी  12 वाजता ते  12.30 वाजेदरम्यान

दुपारी  2 वाजता ते  2.15 वाजेदरम्यान

दुपारी  3 वाजता ते  3.15 वाजेदरम्यान

Web Title: Five times the block will be held today on Mumbai-Pune Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.