‘आवास’साठी सव्वा लाख अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:40 AM2017-08-08T03:40:47+5:302017-08-08T03:40:47+5:30

बहुचर्चित पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर १ लाख १३ हजार २२८ नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.

Five lakh applications for 'housing' | ‘आवास’साठी सव्वा लाख अर्ज

‘आवास’साठी सव्वा लाख अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बहुचर्चित पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर १ लाख १३ हजार २२८ नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मालकी हक्काचे घर नसलेल्यांना सन २०२२ पर्यंत घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी सोमवार, ७ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुदत समाप्तीनंतर १ लाख १३ हजार अर्ज दाखल झाले. यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत २८ हजार ९०, गृहकर्जावरील व्याजाच्या सवलतीसाठी २८ हजार १४८, परवडणाºया घरांसाठी ४१ हजार ७८३ आणि स्वत:च्या जागेवर घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मागणाºयांचे १५ हजार २०७ अर्ज आले आहेत. महापालिकेकडे आलेल्या एकूण अर्जांपैकी आतापर्यंत ३० हजार अर्जांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे, उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आॅनलाइन अर्ज भरताना अनेक अर्जदारांकडून चुका झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, तांत्रिक चुकांमुळे अर्जदार योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी या त्रुटी दूर करण्यासाठी आणखी एक संधी अर्जदारांना दिलीजाणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी पूर्ण करून पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर तसेच ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित घटकातील जनतेला अल्प व्याजदराच्या कर्जावर परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे शहर आणि ग्रामीण भागातील गृहक्षेत्राच्या विकासाला चालना दिली जाणार आहे. शहरी भागामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए), गृहकर्जाच्या व्याजावर सवलत, परवडणाºया किमतीत घरे आणि स्वत:च्या मालकीच्या जागेवर घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे अशा चार घटकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

Web Title: Five lakh applications for 'housing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.