प्रथम रस्ता पूर्ण करा; त्यानंतरच टोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:01 AM2018-07-12T02:01:13+5:302018-07-12T02:01:29+5:30

खेड ते सिन्नर बाह्यवळणासाठी कोणतेही भूसंपादन बाकी नसताना बाह्यवळणाचा रस्ता अपूर्ण का आहे? प्रथम रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच टोल आकारणी करावी. येत्या १५ जुलै रोजी टोल बंद केला जाईल, याशिवाय रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकरी व विविध गावातील नागरिकांनी व्यक्त केली.

 First pass the road; Toll after that | प्रथम रस्ता पूर्ण करा; त्यानंतरच टोल

प्रथम रस्ता पूर्ण करा; त्यानंतरच टोल

Next

नारायणगाव - खेड ते सिन्नर बाह्यवळणासाठी कोणतेही भूसंपादन बाकी नसताना बाह्यवळणाचा रस्ता अपूर्ण का आहे? प्रथम रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच टोल आकारणी करावी. येत्या १५ जुलै रोजी टोल बंद केला जाईल, याशिवाय रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकरी व विविध गावातील नागरिकांनी व्यक्त केली़
दरम्यान, संपादित जमिनींच्या तक्रारी संदर्भात दर गुरुवारी नारायणगाव येथे मंडलाधिकारी कार्यालयात ११ ते ३ या वेळेत भूसंपादनाचे अधिकारी उपस्थित राहून बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा आढावा घेतील, असे आश्वासन भूसंपादन विभाग क्ऱ १३ च्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी व समन्वयिका उपजिल्हाधिकारी समिक्षा चंद्रकार यांनी नारायणगाव येथे दिले़
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येत्या १५ जुलै रोजी चाळकवाडी टोलनाका बंद करून आंदोलन करण्याचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हाधिकारी यांना मागील आठवड्यात देण्यात आले होते़ त्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन न करता समन्वयातून प्रश्न सोडवावा यासाठी दोन वेळा समन्वय बैठक घेण्यात आली होती़ मंगळवारी १० जुलै रोजी दुसरी बैठक कुकडी पाटबंधारे विभागातील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत भोरवाडी, नारायणगाव, वारूळवाडी, पिंपळवंडी, भटकळवाडी व आळेफाटा येथील प्रलंबित बाह्यवळण संदर्भातील शेतकºयांच्या समस्या व अडचणी समजून घेण्यात आल्या़
जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी भूसंपादन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, पोलीस प्रशासन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती़ यावेळी युवा नेते अतुल बेनके, जि़ प़ सदस्य शरद लेंडे, तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, भूसंपादन विभाग क्ऱ १३ च्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी व समन्वयिका उपजिल्हाधिकारी समिक्षा चंद्रकार, जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे सहाय्यक अभियंता दिलीप शिंदे, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी़ आर. उगले, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मोहित ढमाले, कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, आदिवासी नेते मारुती वायाळ, सरपंच विक्रम भोर, अमित बेनके, संजय वारुळे, राजेश बेनके, रघुनाथ लेंडे, सोपान लेंडे आदी मान्यवर व भूसंपादित शेतकरी उपस्थित होते़
यावेळी बोलताना चंद्रकार म्हणाल्या, की शासनाने शेतकºयांना रेडी रेकनरनुसार जमिनीला बाजारभाव दिलेले आहेत़ बाधित शेतकºयांचे सरकारकडून जमिनींचा मोबदला येणे असेल, त्या शेतकºयांना येत्या दहा दिवसांत मोदबला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल़ ज्या शेतकºयांचा कोर्टात मोबदला जमा करण्यात आला होता़ ती रक्कम पुन्हा शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे़ लवकरच ती रक्कम अदा करण्यात येईल़ नागरिकांच्या सर्व तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे माहिती देवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले़
रेश्मा माळी म्हणाल्या, की या बैठकीत नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार पुणे येथील भूसंपादन कार्यालयातून नारायणगाव येथील मंडलाधिकारी कार्यालयात दर गुरुवारी ११ ते ३ या वेळेत येऊन लेखी स्वरूपात कागदपत्रांची पूर्तता करावी़ तसेच कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सादर कराव्यात़ दोन महिन्यांसाठी भूसंपादन विभागाचे अधिकारी नारायणगाव येथे उपलब्ध राहतील़ यावेळी अतुल बेनके म्हणाले, की रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल सुरू होऊ देणार नाही़ महामार्गाचे संपूर्ण काम झाले नाही़ सब ठेकेदार व्ही़ एम. मातेरे पळून जाण्याचे कारण काय? याची उत्तरे द्यावीत. शासनाने स्वत:हून टोल बंद करून जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू नये़
रघुनाथ लेंडे यांनी पिंपळवंडी व भटकळवाडी येथे शेतकºयांच्या चुकीच्या पद्धतीने रस्त्यासाठी जागा संपादित केली आहे़ ज्या शेतकºयांची जागा संपादित केली आहे, त्या शेतकºयांच्या गटातील इतर शेतकºयांच्या सातबारावरही अतिरिक्त भूसंपादन दाखविण्यात आले आहे. महामार्गालगतच्या जागांना सरकारने २०१३ ला प्रतिगुंठा ४८ हजार रुपये हा दिलेला बाजारभाव अन्यायकारक आहे़
वरुण भुजबळ यांनी सांगितले, की कागदपत्रांची पूर्तता करूनही जागेचे निकाल प्रलंबित आहेत़ नारायणगाव व वारूळवाडी शेजारी असूनही नारायणगाव येथील शेतकºयांना जास्त दर व वारूळवाडी येथील शेतकºयांना कमी दर देण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़

समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही

या बैठकीत मुकेश वाजगे हा तरुण भावनाविवश झाला़ वडिलांना उपचारासाठी पुणे येथे नेत असताना वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ वाहतूककोंडीमुळे अनेक घडना घडत आहेत़ आमच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही़ टोल बंद करण्याचा निर्णय योग्यच आहे, असे मत त्याने व्यक्त केले़

या समन्वय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना समन्वय अधिकारी यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने येत्या १५ जुलैला टोलनाका बंद करण्यात येईल, असे अतुल बेनके यांनी जाहीर केले़ या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार संघटना, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन संघटना, आळे ग्रामस्थ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे़

उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी या बैठकीचे नियोजन
केले होते़ मात्र बैठक सुरू होताच देशमुख हे बैठकीतून निघून गेल्याने तसेच या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी. जी. खोडसकर उपस्थित न राहिल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली़

आळे ग्रामपंचायतीचे ग्रा़ प़ं सदस्य धनंजय काळे , येडगावचे सरपंच देविदास भोर, सतेज भुजबळ, अशोक घोडके, सुरज वाजगे, मुकेश वाजगे, राजेश बेनके, धनंजय काळे, बाळासाहेब खिल्लारी, मोहित ढमाले, सोपान लेंडे आदींनी आपल्या समस्या या बैठकीत मांडल्या़
- विक्रम भोर, सरपंच, कांदळी गाव

Web Title:  First pass the road; Toll after that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.