‘सोपानकाकांच्या चरणी अश्व धावले रिंगणी’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:21 PM2019-07-03T14:21:59+5:302019-07-03T14:24:13+5:30

‘ज्ञानोबा- तुकाराम आणि माऊली-माऊली’च्या अखंड जयघोषात अश्वाने रिंगण केले आणि विठ्ठल-विठ्ठल अशा जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला.

first 'Horse circle' in the Sopankaka palkhi sohla | ‘सोपानकाकांच्या चरणी अश्व धावले रिंगणी’ 

‘सोपानकाकांच्या चरणी अश्व धावले रिंगणी’ 

Next
ठळक मुद्देसोमेश्वरनगरला पहिला रिंगण सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती

सोमेश्वरनगर : येथे आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित विठूनामाचा गजर करीत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. ‘सोपानकाकाचरणी अश्व धावता रिंगणी’ हजारो भाविकांचे आणि उपस्थितांचे डोळ्यांचे पारणे फिटले.
मंगळवारी (दि. २) दुपारी ४ वाजता मु.सा. काकडे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे पहिले अश्वरिंगण उत्साहात पार पडले. विठ्ठलनामाच्या जयघोषाने हजारो वारकऱ्यांनी या सोहळ्याची रंगत वाढवली. हा अनुपम सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भक्तांनी गर्दी केली होती. ‘ज्ञानोबा- तुकाराम आणि माऊली-माऊली’च्या अखंड जयघोषात अश्वाने रिंगण केले आणि विठ्ठल-विठ्ठल अशा जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळस आणि वारकऱ्यांनी भगव्या पताका उंचावून या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. विश्वस्त गोपाळमहाराज गोसावी आणि श्रीकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा पार पडला.  तत्पूर्वी, सोमवारी (दि. १) मांडकी (ता. पुरंदर) येथील मुक्काम हलवून पालखीने जेऊर, पिंपरे खुर्द आणि नीरा येथील विसाव्यानंतर सकाळी बारामती तालुक्यात प्रवेश केला. निंबूत येथे सोहळा दाखल झाल्यानंतर शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, माजी सदस्या सविता काकडे, सरपंच राजकुमार बनसोडे, उपसरपंच उदय काकडे, सहायक गटविकास अधिकारी बी. एस. साळवे, ग्रामसेवक सचिन लिंबरकर, प्रदीप काकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबालाल काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या गजरात वारकऱ्यांचे स्वागत केले. ग्रामपंचायत निंबूत, ग्रामविकास प्रतिष्ठान, साहेबरावदादा सोसायटी तसेच परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण, फळे आणि उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.   सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे आदी यावेळी उपस्थित होते.  
...............
४निंबूत छपरी येथे पालखीचे स्वागत गौतम काकडे, सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, अमर काकडे यांनी केले. अक्षय शिंदे फाउंडेशनच्या वतीने वारकºयांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. वाघळवाडी येथे दुपारी तीन वाजता पालखीचे स्वागत सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सतीश सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, पांडुरंग भोसले, ग्रामसेवक सुभाष चौधर, अजिंक्य सावंत महावितरणचे अधिकारी सचिन म्हेत्रे, सचिन साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरीची व्यवस्था करण्यात आली होती. 

Web Title: first 'Horse circle' in the Sopankaka palkhi sohla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.