‘सैनिकहो तुमच्यासाठी’ नाटिका प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:51 AM2018-08-21T01:51:13+5:302018-08-21T01:51:39+5:30

न्यू बाल विकास मंदिर शाळेने पटकावला चषक

First of all, play 'Gillhoeo' for you! | ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ नाटिका प्रथम

‘सैनिकहो तुमच्यासाठी’ नाटिका प्रथम

Next

बारामती : येथील एन्व्हॉयर्नमेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित मृद्गंध २०१८ विविधगुणदर्शन स्पर्धेत पिंपळीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर शाळेच्या ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ नाटिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी मृद्गंध विविधगुणदर्शन स्पर्धा दर वर्षी आॅगस्ट महिन्यात घेतली जाते. स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष आहे. या वर्षी १८ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांच्या प्लॅस्टिकबंदीच्या सादरीकरणाला द्वितीय, तर विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर व विद्या प्रतिष्ठान सीबीएसई स्कूलने सादर केलेल्या ‘हास्यरस’ या सादरीकरणाला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.
विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान केले गेले. उत्कृष्ट अभिनय पुरुष - हर्ष प्रणेता रजपूत (विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर) व आदित्य हनुमंत भोसले (सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, विद्या प्रतिष्ठान), उत्कृष्ट अभिनय महिला- अदिती किरण सोरटे (विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल), सानिका पणधीरकर (विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी), उत्कृषेट नेपथ्य- प्रवीण टिळेकर (विद्या प्रतिष्ठान बिल्ट, भिगवण शाळा), संदीप यादव (विद्या प्रतिष्ठान सीबीएसई स्कूल), उत्कृष्ट लेखन व संवाद एन. बी. रकटे (विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा), उत्कृषेट दिग्दर्शन- कैलास हिलाले (विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी).

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील छोट्या संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा दिवेश मेदगे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे सचिव द. रा. उंडे, विश्वस्त अ‍ॅड. नीलिमा गुजर, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. हनुमंत कुबडे व अजय तपकिरे यांनी परीक्षण केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेसाठी मातृपितृ देवो भव, प्लॅस्टिकबंदी योग्य निर्णय, राष्ट्रउभारणीत संतांचे योगदान, सैनिकहो तुमच्यासाठी, हास्यरस जीवनाचे टॉनिक हे विषय देण्यात आले होते.

Web Title: First of all, play 'Gillhoeo' for you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.