टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग ;जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:52 AM2018-10-10T10:52:46+5:302018-10-10T11:49:58+5:30

सकाळी सव्वानऊच्या सुमारास टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटला अाग लागली. या अागीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला.

fire at tilak road apartment ; no casualty | टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग ;जीवितहानी नाही

टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग ;जीवितहानी नाही

Next

पुणे : सकाळी सव्वानऊच्या सुमारास टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटला अाग लागली. या अागीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून अाग अाटाेक्यात अाणली असून सध्या कुलिंग करण्यात येत अाहे. दरम्यान या अागीत सुदैवाने कुठलिही जीवितहानी झाली नाही.
 
    अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार अाज सकाळी 9.15 च्या सुमारास टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग लागल्याची माहिती मिळाली. या इमारतीमध्ये तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर अग्रवाल कुटुंब राहतात़ बुधवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या टी व्हीजवळ अचानक स्पार्क झाला व घरातील वायरींनी पेट घेऊन आग लागली़ हे लक्षात आल्यावर घरातील सर्व जण बाहेर पळाले़. आग अन्य खोल्यात पसरली. शेजारच्या खोलीत खूप पुस्तके ठेवली होती. त्यांना आग लागल्याने आग वेगाने पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचा मारा करुन काही वेळातच अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. सध्या कुलिंग करण्यात येत अाहे. या अागीत तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने यात कुठलिही जीवितहानी झाली नाही. ज्या फ्लॅटला अाग लागली हाेती त्या फ्लॅटच्या खालच्या मजल्यावर अनेक बॅंकांची कार्यालये अाहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल हाेऊन अाग अाटाेक्यात अाणल्याने या बॅंकांना अागीची झळ पाेहचू शकली नाही. कसबा, एरंडवणे तसेच अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयातून फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या.

    दरम्यान घटनास्थळी नागरिकांची माेठी गर्दी झाली हाेती. काही काळ वाहतूक काेंडीसुद्धा या भागात झाली हाेती. 

Web Title: fire at tilak road apartment ; no casualty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.