पुणे काँग्रेस मध्ये प्रवीण गायकवाड यांच्याविषयी फिफ्टी- फिफ्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 04:19 PM2019-03-30T16:19:05+5:302019-03-30T16:28:35+5:30

काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि प्रविण गायकवाड यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

Fifty-fify about Praveen Gaikwad in Pune Congress | पुणे काँग्रेस मध्ये प्रवीण गायकवाड यांच्याविषयी फिफ्टी- फिफ्टी 

पुणे काँग्रेस मध्ये प्रवीण गायकवाड यांच्याविषयी फिफ्टी- फिफ्टी 

googlenewsNext
ठळक मुद्देनिष्ठावंतांना पक्षाने संधी देणे आवश्यक, ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मागणी उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम

पुणे : काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि प्रविण गायकवाड यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनी पक्षप्रवेश केल्याने त्यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. निष्ठावंतांपैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण बाहेरील उमेदवार नको, अशी भावना काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास त्यांचे काम करू, असेही काहींनी स्पष्ट केले.
मागील आठवडाभर गायकवाड यांचे नाव उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचे बोलले जात होते. दोन दिवसांपूर्वी गायकवाड यांनी उमेदवारी नको असल्याचे युवक काँग्रेसच्या बैठकीत जाहीर केले होते. पण लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये येत शहराध्यक्षांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे बुधवारी अरविंद शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचा निरोप आल्याचे काँग्रेस भवनमध्ये बोलले जात होते. त्यानंतर शिंदे यांनी गाठीभेठीही सुरू केल्या. शुक्रवारपासून पुन्हा गायकवाड यांचे नाव चर्चेत आल्याने गायकवाड की शिंदे या संभ्रमात कार्यकर्ते अडकले आहेत. शनिवारी मुंबईत गायकवाड यांच्या नावाची घोषणा होईल, असे चित्र होते. सायंकाळपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. 
या ह्यसस्पेन्सह्णबाबत बोलताना काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या नावाला विरोध दर्शविला मागील ५० वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत आहे. अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. अनेक नेत्यांसोबत काम केले आहे. त्यामुळे निष्ठावंतांना पक्षाने संधी देणे आवश्यक आहे. गायकवाड यांना उमेदवारी दिली तर कार्यकर्ते नाराज होतील. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास कार्यकर्ते त्यांचे काम करतील. पण त्यांच्याशी जुळवून घेताना अडचणीही येतील, असे महापालिकेतील एका समितीवरील ज्येष्ठ सदस्याने सांगितले. आणखी एका कार्यकत्यार्ने त्यांच्या राजकीय अनुभवाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, गायकवाड यांची सामाजिक कामाची पार्श्वभूमी आहे. त्यांना राजकीय अस्तित्व नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या विचाराने काम करत असल्याचा दावा ते करत असले तरी त्यांना यापुर्वी कधीच काँग्रेस भवनमध्ये पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाबाबत नाराजी आहे.

Web Title: Fifty-fify about Praveen Gaikwad in Pune Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.