वाहनाच्या धडकेने बिबट मादी जखमी; ओतूरजवळील कोळमाथा येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:36 PM2018-01-30T13:36:55+5:302018-01-30T13:39:41+5:30

नगर-कल्याण महामार्गावरील ओतूरजवळील कोळमाथा येथे रविवारी रात्री ८ वाजता  बिबट मादीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती जबर जखमी झाली, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. रघतवान यांनी दिली.

female leopard injured in vehicle accident; incident at Kolmatha near Otur, Pune | वाहनाच्या धडकेने बिबट मादी जखमी; ओतूरजवळील कोळमाथा येथील प्रकार

वाहनाच्या धडकेने बिबट मादी जखमी; ओतूरजवळील कोळमाथा येथील प्रकार

Next
ठळक मुद्देओतूरजवळील कोळमाथा येथे बिबट मादीला अज्ञात वाहनाने दिली जोरदार धडकही बिबट मादी आहे, हिचे वय सुमारे पाच वर्षे असावे : डॉ. अजय देशमुख

ओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील ओतूरजवळील कोळमाथा येथे रविवारी रात्री ८ वाजता  बिबट मादीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती जबर जखमी झाली, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. रघतवान यांनी दिली.
रात्री आठ वाजता ओतूरचे वनरक्षक व्ही. आर. अडागळे  यांना कोळमाथ्यावर एका वाहनाने बिबट्याला धडक बसली आहे. बिबट्या जखमी अवस्थेत आहे, असा दूरध्वनीवरून संदेश मिळाला. ओतूर वनपरिक्षेत्रातील  कर्मचारी वनरक्षक आर. डी. गवांदे, एस. जी. मोमीन, ए. डी. राऊत व जुन्नर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व एस. एस. रघतवान, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ. अजय देशमुख घटनास्थळी आले. 
डॉ. देशमुख यांनी बिबट्याचे  निरीक्षण केले.  ते म्हणाले, ही बिबट मादी आहे. हिचे वय सुमारे पाच वर्षे असावे.

Web Title: female leopard injured in vehicle accident; incident at Kolmatha near Otur, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे