Pune: रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट मार्गावर PMPML ची फिडर सेवा सुरू

By भाग्यश्री गिलडा | Published: March 6, 2024 06:27 PM2024-03-06T18:27:57+5:302024-03-06T18:33:15+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळानेदेखील या मार्गावर मेट्रो फिडर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे....

Feeder service of PMPML started on Ramwadi Metro Station to Lohgaon Airport route | Pune: रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट मार्गावर PMPML ची फिडर सेवा सुरू

Pune: रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट मार्गावर PMPML ची फिडर सेवा सुरू

पुणे : मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मेट्राे स्टेशन या मार्गिकेचे बुधवारी (दि. ६) उद्घाटन झाले. त्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळानेदेखील या मार्गावर मेट्रो फिडर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी या सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू केलेल्या मेट्रो फिडर बससेवेमुळे प्रवासी नागरिकांना मेट्रो स्टेशन्सपर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. दर अर्ध्या तासाच्या वारंवारितेने रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट (मार्गे - साकोरे नगर) आणि रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट (मार्गे – संजय पार्क लेन नं. ६) या दोन मार्गांवर ही सेवा पुरवण्यात येणार आहे. या मेट्रो फिडर बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पीएमपीकडून केले आहे.

Web Title: Feeder service of PMPML started on Ramwadi Metro Station to Lohgaon Airport route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.