परीक्षेचा ताण आलाय ? मग आम्हाला काॅल करा; समुपदेशकांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:10 AM2024-02-16T09:10:02+5:302024-02-16T09:10:29+5:30

राज्य मंडळातर्फे समुपदेशकांची नियुक्ती

Exam stress? Then call us; Appointment of counsellors | परीक्षेचा ताण आलाय ? मग आम्हाला काॅल करा; समुपदेशकांची नियुक्ती

परीक्षेचा ताण आलाय ? मग आम्हाला काॅल करा; समुपदेशकांची नियुक्ती

लाेकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार आणि परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. 

परीक्षेचा ताण आलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी हे समुपदेशक ऑनलाइन समुपदेशन करणार आहेत. सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत माेबाइल क्रमांकावरून नि:शुल्क समुपदेशन केले जाईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

समुपदेशनासाठी हे आहेत माेबाइल क्रमांक 
१. ७३८७४००९७० 
२. ९०१११८४२४२
३. ८४२११५०५२८
४. ८२६३८७६८९६ 
५. ८३६९०२१९४४
६. ८८२८४२६७२२
७. ९८८१४१८२३६
८. ९३५९९७८३१५
९. ७३८७६४७९०२
१०. ९०११३०२९९७.  

Web Title: Exam stress? Then call us; Appointment of counsellors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.