वीरपत्नींचा संघर्ष अखेरपर्यंत, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 03:52 AM2018-05-06T03:52:12+5:302018-05-06T03:52:12+5:30

सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते.

 By the end of the battle of Virapati, former President Pratibhatai Patil | वीरपत्नींचा संघर्ष अखेरपर्यंत, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

वीरपत्नींचा संघर्ष अखेरपर्यंत, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

Next

पुणे - सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते. अशा वीरपत्नींचा संघर्ष सातत्याने सुरूच असतो, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा यशोदा पुरस्कार परमवीरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबीजी यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक विठ्ठल मणियार, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, इस्मालिक अभ्यासक अनिसजी चिश्ती, मयूर जाधव, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, माजी उपमहापौर दीपक मानकर, अ‍ॅड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, जमील आलम, माधवराव मानकर आदी उपस्थित होते. १ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मानपत्राचे वाचन डॉ. सुनील देवधर यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन मानकर यांनी आभार मानले.

सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न
 पाटील म्हणाल्या की, सैनिक शहीद झाल्यानंतर त्याचा गंभीर परिणाम पत्नीवर होतो. कुटुंबाचा आर्थिक भार सहन करत मुलांना शिकवावे लागते. अशा वेळी तिच्या धैर्याला दाद द्यावी लागेल. हा संघर्ष काही सोपा नाही. देशाप्रति प्रचंड निष्ठा, त्याग यामुळे ती आपल्यासमोरील संकटांचा जिद्दीने सामना करते. सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न आहेत. देशात राजस्थानात सर्वाधिक वीरपत्नी असून, त्यांची संख्या ११00 इतकी आहे.
 पवार म्हणाले की, भारतीय म्हणून आता आपण सर्वांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. त्यात कुठलीही जात, धर्म, वंश येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अनीस चिश्ती म्हणाले, सैनिक ज्याप्रमाणे कुठलीही जात, धर्म मानत नाहीत त्याप्रमाणे नागरिकांनीदेखील आपण सर्वजण भारतीय आहोत या संकल्पनेखाली एकत्र येणे महत्त्वाचे आहे. डॉ. देखणे यांनी वारकरी संप्रदाय तसेच भागवत धर्मातील अनेक उदाहरणे देऊन धर्म आणि मानवता यांचे नाते स्पष्ट केले.

इतना सन्मान मिला अच्छा लगा

९५ वर्षीय रसुलन बीबी सत्कार सोहळ्याने भारावून गेल्या. क्षणभर त्यांना काय बोलावे हे सुचत नव्हते. त्यांनी आयोजक आणि समस्त पुणेकरांचे आभार मानले.
‘‘हमे इतना सन्मान मिला
अच्छा लगा, बहुत धन्यवाद. पती जाने के बाद हिंदुस्थान ने बडी इज्जत दी’’ या शब्दांत
त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title:  By the end of the battle of Virapati, former President Pratibhatai Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.