महाविद्यालयांमध्ये ‘इलेट्रोरल लिटरसी क्लब’ - सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:58 PM2017-12-21T21:58:17+5:302017-12-21T21:58:29+5:30

निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे, लोकशाहीला बळकटी देणे आणि तरुणांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे यासाठी महाविद्यालय स्तरावर  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे.

'Elealtoral Literacy Club' in the colleges - Saurabh Rao | महाविद्यालयांमध्ये ‘इलेट्रोरल लिटरसी क्लब’ - सौरभ राव

महाविद्यालयांमध्ये ‘इलेट्रोरल लिटरसी क्लब’ - सौरभ राव

Next

पुणे : निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे, लोकशाहीला बळकटी देणे आणि तरुणांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे यासाठी महाविद्यालय स्तरावर  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत ७४ महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. 
केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार पुनरिक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. मतदार नोंदणीसाठी ४९ हजार अर्ज आले असून यातील ३७ हजार ३७७ मतदारांची डेटा एंट्री पूर्ण झाली आहे. तर १२ हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरु आहे. यामध्ये आॅनलाईन २५ हजार ८०१ अर्ज आलेले आहेत. तर २६ हजार ८६० अर्ज आॅफलाईन आलेले आहेत. या अर्जांची १०० टक्के माहिती भरुन ३१ डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर १० जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राव यांनी सांगितले. या कामासाठी जिल्ह्यामध्ये २१ निवडणूक अधिकारी आणि ३८ सहायक निवडणूक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. वेळ कमी असल्याने तीन पाळींमध्ये काम करण्यात येत आहे. 
जनजागृती करण्याबरोबरच विद्यापीठ, महाविद्यालयीन स्तरावर युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रिय निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या मतदारांसह १ जानेवारी २००० या दिवशी जन्म झालेल्या ‘सहस्त्रक मतदारां’ची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मतदारांना  ‘युथ आयकॉन’ म्हणून निवडण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवस या दिवशी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 
जिल्हा व शहर मिळून २१ मतदार संघांमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे. यासोबतच दिव्यांग मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी आस्था निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, विविध सामाजिक संस्था सहभागी होणार असून त्यांच्या समन्वयातून मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी निवडणूक प्रक्रियेविषयी संवाद होत राहीला तर लोकशाहीला बळ मिळेल या उद्देशाने महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात येत असलेल्या  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची संख्या २०० नेणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: 'Elealtoral Literacy Club' in the colleges - Saurabh Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.