आठवीची पुस्तके बाजारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:01 PM2018-05-18T14:01:21+5:302018-05-18T14:01:21+5:30

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये इयत्ता पहिली, आठवी व दहावीची पाठ्यपुस्तके नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात येत आहेत. इयत्ता दहावीची सर्व पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत.

Eight standred books in the market | आठवीची पुस्तके बाजारात 

आठवीची पुस्तके बाजारात 

Next
ठळक मुद्देइयत्ता पहिली व आठवीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरूउर्वरित पुस्तकेही लवकरच उपलब्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती) मार्फत इयत्ता आठवीची काही पाठ्यपुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित पाठ्यपुस्तके लवकरच उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी दिली. 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये इयत्ता पहिली, आठवी व दहावीची पाठ्यपुस्तके नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात येत आहेत. इयत्ता दहावीची सर्व पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत. इयत्ता पहिली व आठवीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. आठवीच्या पाठ्यपुस्तकांची छपाईदेखील सुरू आहे. त्यापैकी काही पुस्तके दि. १४ मेपासून बाजारात विक्रीसाठी आली आहेत. उर्वरित पुस्तकेही लवकरच उपलब्ध होतील, असे डॉ. मगर यांनी सांगितले. 
जून २०१८ च्या मध्यापर्यंत म्हणजे शाळा सुरू होण्यापुर्वी इयत्ता पहिली व इयत्ता आठवीची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियान योजनेमार्फत पोहोच केली जातील. तसेच बाजारामध्ये विक्रीसाठी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जातील, अशा पध्दतीने नियोजन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळतील, याबाबत बालभारतीकून दक्षता घेण्यात येत असल्याचे डॉ. मगर यांनी स्पष्ट केले.
-----------------
 

Web Title: Eight standred books in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.