मारहाणप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा, इंदापूरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:15 AM2018-01-05T02:15:49+5:302018-01-05T02:15:59+5:30

जागेच्या कारणावरून महिलेसह चौघांना तलवार, लोखंडी गज, कोयता व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून खबालेवस्ती (शहा, ता. इंदापूर) येथील ८ जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 Eight people, including four women, have been booked for assault, an incident in Indapur | मारहाणप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा, इंदापूरमधील घटना

मारहाणप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा, इंदापूरमधील घटना

Next

इंदापूर - जागेच्या कारणावरून महिलेसह चौघांना तलवार, लोखंडी गज, कोयता व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून खबालेवस्ती (शहा, ता. इंदापूर) येथील ८ जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.
सुनील अजिनाथ खबाले, महादेव कृष्णा खबाले, तुषार महादेव खबाले, ओंकार रावसाहेब खबाले, सुवर्णा महादेव खबाले, संगीता रावसाहेब खबाले, स्वप्नाली प्रदीप खबाले, दीपाली सुनील खबाले (सर्व रा. खबालेवस्ती) अशी आरोपींची नावे आहेत.
सोमनाथ रामदास खबाले (वय ३२, रा. खबालेवस्ती) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
आज सकाळी ११ च्या सुमारास खबालेवस्ती येथील फिर्यादीच्या शेतात ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये जमीन गट क्र. २९ मधील फिर्यादीच्या मालकीच्या शिल्लक जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून वाद होत होते. फिर्यादीच्या जमिनीमध्ये सुनील खबाले याचे घर आहे. त्यांच्या राहत्या घरासमोरची जागा तो वापरत आहे.

आज सकाळी ११च्या सुमारास फिर्यादी व त्याचे आई-वडील शेताच्या बांधावर दगड रचण्यासाठी बांधाच्या कडेला ट्रॅक्टरमधून दगड खाली करून घेत होते. त्या वेळी तलवार, गज, कोयते व दगड घेऊन आरोपी तेथे आले. तुमचा या जागेत काही संबंध नाही. ती जागा आमचीच आहे, असे म्हणत त्यांनी या तिघांवर शस्त्रांनी हल्ला चढविला. फिर्यादीचा भाऊ नवनाथ त्यांना सोडविण्यासाठी आला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली, अशा आशयाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार दिनेश कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Eight people, including four women, have been booked for assault, an incident in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.