विद्यार्थिनींना परीक्षा केंद्र बदलून देण्याचा विचार, शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:47 PM2018-03-05T22:47:40+5:302018-03-05T22:47:40+5:30

पुणे : लोणीकाळभोर येथील एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थिंनीची कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी आमदार नीलम गोऱ्हे हे व आमदार मेधा कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्या विद्यार्थींना परीक्षा केंद्र बदलून देण्याचा विचार सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले आहे.

education ministers thinking of ​​changing the examination center to the students, explanation of the education ministers | विद्यार्थिनींना परीक्षा केंद्र बदलून देण्याचा विचार, शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

विद्यार्थिनींना परीक्षा केंद्र बदलून देण्याचा विचार, शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देदोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.परीक्षा केंद्र बदलण्याबाबत अद्याप कुठल्याही सुचना शासनाकडून आल्या नसल्याचे पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : लोणीकाळभोर येथील एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थिंनीची कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी आमदार नीलम गोऱ्हे हे व आमदार मेधा कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्या विद्यार्थींना परीक्षा केंद्र बदलून देण्याचा विचार सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले आहे.
लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थिनींची तपासणी ही महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.आदल्यादिवशी काही विद्यार्थीनी कॉपी करताना सापडल्या होत्या. त्यामूळे त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी कडक तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर तेथील ८१ विद्यार्थीनींना परीक्षा केंद्र बदलून देण्याबाबत शासन विचार करीत आहे,असे विनोद तावडे यांनी सांगितल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे, यामध्ये दोषी 
आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.परीक्षा केंद्र बदलण्याबाबत अद्याप सुचना नाही.बारावीचे आता केवळ काहीच पेपर शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थींनीचे परीक्षा केंद्र बदलण्याची शक्यता कमीच आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबत अद्यापही कुठल्याही सुचना शासनाकडून आल्या नसल्याचे पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी स्पष्ट केले आहे. एमआयटीच्या महाविद्यालयामध्ये झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोर्डाचे एक पथक सोमवारी त्या महाविद्यालयामध्ये पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर या केंद्रावर एक महिला शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. 
लोणीकाळभोर येथे विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी तिथल्या प्राचार्यांसह संस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले . यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, चंद्रशेखर घाडगे, प्रशांत धुमाळ, विश्वजीत चौगुले, सुहास उभे, मयुर सुतार, अमरजित जमादार उपस्थित होते.

Web Title: education ministers thinking of ​​changing the examination center to the students, explanation of the education ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.