पुण्याचा शैक्षणिक वारसा प्रेरणादायी : रामनाथ कोविंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:56 PM2018-05-30T19:56:02+5:302018-05-30T19:56:02+5:30

आधुनिक भारताच्या जडण-घडणीत शैक्षणिक संस्थांचा मोठा वाटा असून या संस्थांना इतिहास मोठा आहे.त्यात पुण्यातील संस्थांचा समावेश आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुण्याचा गौरव केला.

education heritage inspirational of Pune : Ramnath Kovind | पुण्याचा शैक्षणिक वारसा प्रेरणादायी : रामनाथ कोविंद

पुण्याचा शैक्षणिक वारसा प्रेरणादायी : रामनाथ कोविंद

Next
ठळक मुद्दे साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटनविद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व जागतीक शिक्षणाबरोबरच मुल्य शिक्षणाची आवश्यकताशिक्षकांनी दिलेले ज्ञान हीच विद्यार्थ्यांची खरी ओळख

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून पुणे देशात प्रसिद्ध असून आधुनिक भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी याच पुण्यात घातला. तसेच लोकमान्य टिळक व त्यांच्या सहका-यांनी येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यामुळे पुण्याला मोठा शैक्षणिक वारसा असून तो येथील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुण्याचा गौरव केला. तसेच पुणे शहराच्या नावलौकीकात भर घालण्यासाठी साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल उत्कृष्ट योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलच्या उद्धघाटन प्रसंगी राष्ट्रपती कोविंद बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्र्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, दादा जे. पी. वासवानी, रत्ना वासवानी या प्रसंगी उपस्थित होते.
कोविंद म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले असले पाहिजेत.तसेच विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच मुल्य शिक्षण व चांगले संस्कार रूजविणे गरजेचे आहे.शिक्षणात सुसंवाद ही संस्कृती निर्माण झाली पाहिजे. शिक्षकांनी दिलेले ज्ञान हीच विद्यार्थ्यांची खरी ओळख असते. तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपादन करून समाजाला व देशाला विसरू नये ,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त यावेळी केली.
जावडेकर म्हणाले, गुणांची टक्केवारीतून निर्माण झालेली स्पर्धा घातक असून केवळ परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे शिक्षण आहे का? याचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच पाठपुस्तकातील ज्ञान घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळे खेळणे आवश्यक आहे.
दादा जे. पी. वासवानी यांनी देशाला नवीन शिक्षण पध्दतीची आवश्यकता असल्याचे सांगितले.तसेच विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व जागतीक शिक्षणाबरोबरच मुल्य शिक्षणाची आवश्यकता असल्याचे नमूद केले.त्याचप्रमाणे नवीन शिक्षण पद्धतीमुळे मानवतेचा विकास होण्यास मदत होईल,असेही यांनी सांगितले.
कार्यक्रमात लालकृष्ण आडवाणी यांनी मनोगत व्यक्त केले. साधू वासवानी मिशनच्या गुलशन गिडवानी प्रास्ताविक यांनी केले.  प्राचार्या आरती पाटील यांनी आभार मानले.  
 

Web Title: education heritage inspirational of Pune : Ramnath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.