महिनाभरात पेट्रोल-डिझेलचे भाव दोन-तीन रुपयांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 07:13 PM2020-12-19T19:13:12+5:302020-12-19T19:13:54+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर क्रूड ऑईलचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव शून्य डॉलरवर आले होते..

During the month, petrol and diesel prices went up by Rs 2-3 rupees increasing | महिनाभरात पेट्रोल-डिझेलचे भाव दोन-तीन रुपयांनी वाढले

महिनाभरात पेट्रोल-डिझेलचे भाव दोन-तीन रुपयांनी वाढले

Next

पिंपरी : इंधनाच्या दरामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढ होत आहे. गेल्या महिनाभरामध्ये पेट्रोलचे भाव लिटरमागे २.३३ रुपयांनी तर, डिझेलचे भाव ३.२६ रुपयांनी वाढले आहेत.शनिवारी (दि. १९) पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ९०, तर डिझेलचा ७८.९७ रुपये होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर क्रूड ऑईलचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव शून्य डॉलरवर आले होते. आंतरराष्ट्रीय दरातील घसरणीचा फायदा ग्राहकांना होईल, असे वाटत होते. क्रूड अ़ॉईल खरेदीनंतर ते देशात येऊन त्यावर प्रक्रिया करण्यास ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर त्याचा फायदा मिळेल, असे ऑईल कंपन्यांमधील अधिकारी खासगीत सांगत होते. मात्र, इंधनाच्या किमती काही कमी झाल्या नाहीत. उलट नोव्हेंबरपासून इंधनामध्ये पुुन्हा थेंबाथेंबाने वाढ होऊ लागली आहे. शहरात २० नोव्हेंबरला पेट्रोलचा भाव ८७.६७ आणि डिझेलचा भाव ६७.७१ रुपये होता. त्यात महिनाभरामध्ये पेट्रोल २.३३ रुपये आणि डिझेल ३.२६ रुपयांनी महागल्याचे दिसून येत आहे. सीएनजीचे भाव ५३.८५ रुपयांवर स्थिर आहेत.

-----------
इंधनाचे प्रतिलिटर भाव
इंधन प्रकार               २० नोव्हेंबर     २६ नोव्हेंबर        ५ डिसेंबर        १९ डिसेंबर
पेट्रोल                           ८७.६७             ८८.०७            ८९.४४            ९०

डिझेल                          ७५.७१            ७६.६४            ७८.४१             ७८.९७

Web Title: During the month, petrol and diesel prices went up by Rs 2-3 rupees increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.