कंत्राटी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्यामुळे पुणे महापालिकेत पुन्हा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:00 PM2017-12-28T17:00:07+5:302017-12-28T17:02:30+5:30

स्मार्ट या संस्थेकडून मानधन तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्यामुळे महापालिकेत पुन्हा प्रशासन पदाधिकारी असा वाद सुरू झाला आहे.

Due to a sudden reduction in contract workers from work, the re-argument in Pune Municipal Corporation | कंत्राटी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्यामुळे पुणे महापालिकेत पुन्हा वाद

कंत्राटी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्यामुळे पुणे महापालिकेत पुन्हा वाद

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना कामावर घ्यावे यासाठी महापालिकेतच केले आंदोलन महापौर आणि उपमहापौर यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करण्याचे दिले आश्वासन

पुणे : स्मार्ट या संस्थेकडून मानधन तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्यामुळे महापालिकेत पुन्हा प्रशासन पदाधिकारी असा वाद सुरू झाला आहे. कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे म्हणून पदाधिकारी आग्रही आहेत तर महापालिकेचे कायम कर्मचारी उपलब्ध असताना त्यांना कामावर का घ्यावे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर त्यांना कामावर घ्यावे यासाठी महापालिकेतच आंदोलन केले.
स्मार्ट या संस्थेकडून महापालिकेत गेली अनेक वर्षे संगणकावर काम करणारे कर्मचारी मानधन तत्वावर घेतले जातात. त्यांना महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातून जशी मागणी असेल त्याप्रमाणे पाठवले जाते. महापालिकेत संगणकाद्वारे काम सुरू झाले त्यावेळी महापालिकेच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना संगणकावर काम करता येत नव्हते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी उपयुक्तता जास्त होती. त्यानंतर महापालिकेचे बहुतेक कायम कर्मचारी संगणक आॅपरेटिंग शिकले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची गरज संपली. मात्र त्यांना काम मिळावे यासाठी त्यांची नियुक्ती तशीच ठेवली गेली.
महापालिकेच्या कामाचा व्यापही वाढत गेल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामही होते. मात्र आता प्रशासकीय खर्चही वाढत असल्यामुळे प्रशासनाने काही दिवसांपुर्वीपासून कंत्राटी कामगारांना कमी करणे सुरू केले आहे. १ हजार ८०० सुरक्षा रक्षकांपैकी ९०० सुरक्षा रक्षकांना कमी करण्यात आले. त्यानंतर आता स्मार्ट संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले. सुरक्षा रक्षक कामावर येतच नव्हते, गरज नसताना त्यांची नियुक्ती करण्यात आली होती असे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्मार्ट संस्थेचे कर्मचारी असल्यामुळे संगणक येत असूनही महापालिकेचे कायम कर्मचारी काम करीत नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
त्यामुळे मनसेच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. गटनेते वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह स्मार्ट संस्थेच्या कामावरून कमी केलेल्या सेविका उपस्थित होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Due to a sudden reduction in contract workers from work, the re-argument in Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.