पावसाअभावी नद्यांचे पात्र कोरडे, दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:36 AM2018-10-26T01:36:10+5:302018-10-26T01:36:16+5:30

खेड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Due to the absence of rain, drying of rivers, drought will start | पावसाअभावी नद्यांचे पात्र कोरडे, दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात

पावसाअभावी नद्यांचे पात्र कोरडे, दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात

Next

दावडी : खेड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊस कमी पडल्यामुळे पिके खरीप हंगामातील पिके कशीबशी निघाली. मात्र, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार आहे. तालुक्यातील पूर्व भागात तर भयानक वास्तव उभे राहणार आहे. काही वाडी-वस्तीवर आताच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू लागली आहे. तसेच, जनावरांचा चाराही वाळून गेलेला आहे.
जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या निरीक्षणानुसार पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी दहा तालुके दुष्काळसदृश घोषित करण्यात आले आहे. त्यापैकी खेड तालुका मात्र दुष्काळग्रस्तांचे निरीक्षण नोंदवण्यात आले नाही. खेड तालुक्यात जून, जुलै, आॅगस्टचा पाऊस समाधानकारक झाला. त्याअनुषंगाने खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु पिकाच्या उत्पन्नासाठी असणारा सप्टेंबर, आॅक्टोबर या महिन्यात पाऊस न झाल्याने खेड तालुक्यात भाताची पिके जळून गेली आहेत. तसेच अपुºया पावसामुळे शेतकºयांनी केलेल्या कांदालागवडी धोक्यात येणार आहेत.
रब्बीसाठी तर पेरण्याच होऊ शकत नाही, अशी भयानक परिस्थिती आहे. पूर्व भागातील गाडकवाडी, वरुडे, वाफगाव, पूर, कनेरसर, गोसासी, जऊळके, गुळणी, वाकळवाडी ही गावे अवर्षणप्रवणमध्ये मोडतात. यंदा या भागात पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने पाण्याची पातळी घटली आहे.
याबाबत प्रशासनाने या परिसराची पाहणी करून दुष्काळ देखरेख समितीला माहिती द्यावी, अशी मागणी संतोष गार्डी,राजेंद्र टाकळकर, गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे, वाकळवाडीच्या सरपंच सोनाली नाईकवडी, पूरचे उपसरपंच संदीप गावडे यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.
>खेड तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. याबाबत कृषी विभागाला गाव व वाडीवस्तीवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे त्या ठिकाणी उपलब्ध असणारे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहेत; तसेच बेकायदेशीरपणे पाणीउपसा करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण परिसराची पाहणी करून खेड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, असा अहवाल शासनाकडे पाठवून देण्यात येणार आहे.
- सुचित्रा आमले-पाटील,
तहसीलदार, खेड

Web Title: Due to the absence of rain, drying of rivers, drought will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.