बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:35 AM2018-02-07T11:35:52+5:302018-02-07T11:36:15+5:30

बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी दांपत्य पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.

DS Kulkarni, the couple present at the Pune Police Commissioner's Office for inquiry | बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील ५ दिवस होणार चौकशीगुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीची भावना

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी दांपत्य पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील ५ दिवस चौकशी होणार आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत तर त्यानंतर ३ ते ५ अशा वेळेत ही चौकशी होणार आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची आजपासून पुढील ५ दिवस चौकशी होणार आहे. तर १३ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात कुलकर्णी दाम्पत्यास हजर व्हावे लागणार आहे. कुलकर्णी यांनी तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी ३ वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र कुलकर्णी यांच्याकडून अद्याप ही रक्कम भरण्यात आलेली नाही. उसणे आणा, भीक मागा मात्र रक्कम जमा करा, असेही न्यायालयाने फटकारले होते. त्या पार्श्वभूमीवर आजपासून पुढील ५ दिवस त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे. आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: DS Kulkarni, the couple present at the Pune Police Commissioner's Office for inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.