डी. एस. कुलकर्णी यांच्या पैशांचा माग काढण्यासाठी लेखापरीक्षक, ३०१ मालमत्ता शोधून ताब्यात घेण्याचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:51 AM2017-12-17T05:51:46+5:302017-12-17T05:52:13+5:30

D. S. To track Kulkarni's money, the auditor, 301 properties to locate and take possession of the report | डी. एस. कुलकर्णी यांच्या पैशांचा माग काढण्यासाठी लेखापरीक्षक, ३०१ मालमत्ता शोधून ताब्यात घेण्याचा अहवाल

डी. एस. कुलकर्णी यांच्या पैशांचा माग काढण्यासाठी लेखापरीक्षक, ३०१ मालमत्ता शोधून ताब्यात घेण्याचा अहवाल

googlenewsNext

पुणे : गुंतवणूकदार व फ्लॅटधारकांनी दिलेल्या पैशांची गुंतवणूक डी. एस. कुलकर्णी यांनी कोठे-कोठे केली, याचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे. याचबरोबर, डीएसके यांच्या ३०१ मालमत्ता शोधून काढून त्या ताब्यात घेण्याचा अहवाल जिल्हाधिका-यांना दिला आहे. त्यांनी पुढील कारवाईसाठी प्राधिकृत अधिका-याची नेमणूक केली आहे.
गुंतवणूकदारांच्या ठेवी परत न केल्याने दाखल झालेला फसवणुकीचा गुन्हा सध्या उच्च न्यायालयाने डी़ एस़ कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना जामिनासाठी १५ दिवसांत न्यायालयात ५० कोटी रुपये भरण्याची अंतिम मुदत दिली आहे़ याबाबत येत्या १९ डिसेंबरला सुनावणी होईल. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास
असून पोलिसांनी ड़ी एस़ कुलकर्णी यांच्या घरी तसेच विविध ठिकाणच्या कार्यालयांवर छापा घालून संबंधित सर्व कागदपत्रे, विविध कंपन्यांचे ताळेबंद जप्त केले़ त्यांच्या सर्व्हरवरील सर्व माहिती स्वत:कडे घेतली़ गुंतवणूकदार व फ्लॅट घेण्यासाठी डीएसके यांच्याकडे दिलेल्या पैशांचे नेमके काय झाले, पैसे नेमके कोठे गेले, याच्या व्यवहाराच्या हिशेबाची तपासणी करण्यासाठी पुणे पोलिसांना लेखापरीक्षकांची मदत आवश्यक होती. त्यासाठी पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंट डी़ जे़ ठकरार यांची नेमणूक केली आहे़ डीएसके यांच्याशी संबंधित कागदपत्रे, ताळेबंद याची पडताळणी करून त्याचा अहवाल ते पोलिसांना देणार आहेत, असे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक
पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांनी गुंतवणूक केलेल्या ३०१ मालमत्ता शोधून काढल्या असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिका-यांना सादर करण्यात आला आहे़ या मालमत्तेसंबंधी पुढील कारवाई महसूल विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाºयांनी त्यासाठी वडगाव मावळच्या उपविभागीय अधिका-यांची नेमणूक केली आहे़

Web Title: D. S. To track Kulkarni's money, the auditor, 301 properties to locate and take possession of the report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.