पुण्यात वारजे पुलावरून बस कोसळली; १७ जण जखमी, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 11:47 AM2018-07-02T11:47:56+5:302018-07-02T13:32:28+5:30

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस वारजे पूलावरुन खाली कोसळली.

The driver lost control, the bus collapsed on the bridge in Pune | पुण्यात वारजे पुलावरून बस कोसळली; १७ जण जखमी, एक गंभीर

पुण्यात वारजे पुलावरून बस कोसळली; १७ जण जखमी, एक गंभीर

googlenewsNext

पुणे -  कात्रजहून निगडीकडे जाण्याऱ्या पीएमपीएल बसला वारजे पूलावर अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस वारजे पूलावरुन खाली कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार एमएच 14 सीडब्ल्यू 3088 ही बस कात्रजहून निगडीकडे भरधाव वेगाने निघाली होती. त्यावेळी चालकाचे नियंत्र सुटल्याने बस वारजे पुलावरून खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळली. या अपघातामध्ये 17 लोक जखमी, एक गंभीर अन्य 16 किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीवर वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: The driver lost control, the bus collapsed on the bridge in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.