ज्येष्ठांसाठी स्वतंत्र न्यायालय करू

By admin | Published: October 2, 2014 12:09 AM2014-10-02T00:09:41+5:302014-10-02T00:09:41+5:30

ज्येष्ठ नागरिकांचे कौटुंबिक वाद-विवाद अलीकडच्या काळात वाढत आहेत. संपत्ती, पालनपोषणवरून कुटुंबात कलह निर्माण होत असताना ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होत आहे.

Do the independent jurists of the jury | ज्येष्ठांसाठी स्वतंत्र न्यायालय करू

ज्येष्ठांसाठी स्वतंत्र न्यायालय करू

Next
पुणो :  ज्येष्ठ नागरिकांचे कौटुंबिक वाद-विवाद अलीकडच्या काळात वाढत आहेत. संपत्ती, पालनपोषणवरून कुटुंबात कलह निर्माण होत असताना ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होत आहे. अशा वेळी त्यांच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सत्तेत आल्यास अशा नागरिकांना संरक्षण देऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोमर्यादा 6क् वर्षे ठेवण्याचा प्रय} केला जाईल. भविष्यात राजीव गांधी योजनेनुसार आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र व पारदर्शी यंत्रणा उभी केली जाईल. ज्येष्ठ नागरिक कायदा करून ज्येष्ठांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना केली जाईल. यातून तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा प्रदान होईल. ज्या वृद्धांची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात येईल. असे आश्वासन  कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचार पदयात्रेदरम्यान दिले. 
 प्रभाग क्रमांक 49 मध्ये प्रचार पदयात्रेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांना उद्देशून गिरीश बापट बोलत होते. सायंकाळी पाच वाजता शुक्रवार पेठेतून ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठांचे सत्कार केले. या वेळी राजेश येनपुरे, बापू नाईक, अतुल केंडूकर, भागीरथ भुतडा, योगेश वेदपाठक, जितेंद्र दळवी, नामदेव माळवदे, पुष्कर तुळजापूरकर, नीलेश कदम, प्रमोद कोंढरे, विनायक कदम, भारत निजामपूरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.   (प्रतिनिधी)

 

Web Title: Do the independent jurists of the jury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.