पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:17 AM2018-06-16T04:17:28+5:302018-06-16T04:17:28+5:30

वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे हे मनमानी व भ्रष्ट कारभार करीत आहेत. तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकाºयांनी शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी करून त्यासाठी पोलीस अधिक्षकांना साकडे घातले आहे.

Demand for transfer of Police Inspector | पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी

पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी

Next

वाडा - वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे हे मनमानी व भ्रष्ट कारभार करीत आहेत. तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकाºयांनी शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी करून त्यासाठी पोलीस अधिक्षकांना साकडे घातले आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश पटारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रोहीदास पाटील, कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष कैलास पाटील, मनसेचे तालुकाप्रमुख कांतीकुमार ठाकरे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील, तालुकाध्यक्ष रविंद्र मेणे या प्रमुख पदाधिकाºयांचे शिष्टमंडळ पोलीस अधिक्षक मंजुनाथ शिंगे यांना भेटले. मात्र शिंदे यांनी हे आरोप फेटाळले.
सुदाम शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जनतेला वेठीस धरले आहे. निष्पाप नागरिकांवर ते खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. अलिकडेच वाड्यात एका महिलेची छेड काढणाºया ट्रक चालकाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला. या घटनेशी कोणताही संबंध नसलेल्या काही निष्पाप तरूणांवर त्यांनी गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांवर अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तर गॅस पाईपलाईन टाकणाºया रिलायन्स कंपनी विरोधात एखाद्या बाधित शेतकºयाने नुकसान भरपाईकरिता आवाज उठवला तर त्या शेतकºयाला दमदाटी करून जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या ते देत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
तालुक्यातील भंगाराचा धंदा करणाºया व्यापाºयांबरोबर त्यांचे साटेलोटे आहे. तर लोखंडाची वाहतूक करणाºया चालकांकडून रात्री नाक्यावर पोलीस उभा करून खुलेआम वसुली केली जाते असा आरोप निवेदनात केला आहे. तर तालुक्यातील एका पोलीस पाटलाला विनाकारण काही तास पोलीस कोठडीत डांबवून ठेवल्याचा आरोपही केला गेला आहे. आदिवासी नागरिकांचा घरगुती किरकोळ वाद झाला असता दोन्ही गटाच्या आठ ते दहा जणांवर विनाकारण गुन्हे दाखल करून त्यांना कोठडीत टाकले गेले. अलिकडेच तोरणे इस्पात या कारखान्यात भट्टीचा स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांनी चांगलेच हात धुतल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे.
मनमानी व भ्रष्ट कारभार करणाºया शिंदेंमुळे पोलीस खात्याची बदनामी होत असल्याने त्यांची तत्काळ येथून बदली करावी अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा सर्व पक्षीय संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात दिला आहे. सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वाडा पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर आला असून पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा भ्रष्ट कारभार सुरु असून दलालांचा राबता त्यांच्या कार्यालयात असतो. दलाल तासनतास त्यांच्या कार्यालयात बसून असतात. पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज बघितल्यास हे सर्व उघड होईल.
- दिलीप पाटील,
अध्यक्ष, काँग्रेस वाडा तालुका

शिंदे हे आपल्या पदाचा गैरवापर करीत असून प्रत्येकाला एन्काऊंटर करण्याची धमकी देतात. मी अठरा एन्काऊंटर केले आहेत. अशी दमबाजी करतात.
- जितेश पाटील, अध्यक्ष,
स्वाभिमान संघटना,
पालघर जिल्हाॉ

सामान्य नागरिकाला कोणत्याही मध्यस्थाशिवाय पोलीस ठाण्यात प्रवेश दिला जात असून प्राधान्याने त्यांच्या तक्रारी नोंदविल्या जातात. वस्तुस्थितीला धरून कायदेशीर कारवाई होत असल्याने काहींचे हितसंबध दुखावले असल्याने असे निराधार आरोप होत आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज नियमानुसारच व कायदेशीर पद्धतीने सुरु आहे.
-सुदाम शिंदे, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे

Web Title: Demand for transfer of Police Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.