तुकाराम महाराजांविषयीही आक्षेपार्ह लिखाण, विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 11:14 PM2018-10-12T23:14:05+5:302018-10-12T23:14:20+5:30

शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यासाठी निवडण्यात आलेल्या आणखी एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

The demand for resignation of Vinod Tawde, objectionable books about Tukaram Maharaj | तुकाराम महाराजांविषयीही आक्षेपार्ह लिखाण, विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी

तुकाराम महाराजांविषयीही आक्षेपार्ह लिखाण, विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी

Next

पुणे : शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यासाठी निवडण्यात आलेल्या आणखी एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. संतांचे जीवन प्रसंग या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख करण्यात आले आहेत. गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण असल्याचे गुरुवारी उजेडात आले. त्यापाठोपाठ आता दुस-या पुस्तकात तुकाराम महारांजाबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. 
तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहमी शिव्याच बाहेर यायच्या. ह्यत आमचं येडं  असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले, असा आक्षेपार्ह उल्लेख या पुस्तकात आहे.

संभाजी ब्रिगेडने यावर तीव्र आक्षेप घेतला असून संत तुकाराम आणि संभाजी महाराजांची बदनामी सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकातून केली जाते आहे. चुकीची माहिती पुढे पसरवली जाते आहे. अशा मजकुरांमधून चुकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

Web Title: The demand for resignation of Vinod Tawde, objectionable books about Tukaram Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.