कसब्यात भाजपचे १२ नगरसेवक असूनही पराभव; महापालिका निवडणुकीवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 04:23 PM2023-03-02T16:23:40+5:302023-03-02T16:23:51+5:30

अनेकांचा पत्ता कट होणार असून सहा प्रभागामध्ये मिळालेल्या मताधिक्यावर भाजपमधील इच्छुकांचे भवितव्य ठरणार

Defeat despite 12 BJP corporators in Kasbay Impact on municipal elections | कसब्यात भाजपचे १२ नगरसेवक असूनही पराभव; महापालिका निवडणुकीवर होणार परिणाम

कसब्यात भाजपचे १२ नगरसेवक असूनही पराभव; महापालिका निवडणुकीवर होणार परिणाम

googlenewsNext

पुणे: कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या विजयी घोडदौडीला रोखता येऊ शकते याबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीवर या पोटनिवडणुकीचा मोठा परिणाम होणार आहे. या मतदारसंघातील सहा प्रभागामध्ये मिळालेल्या मताधिक्यावर आता भाजपमधील पालिकेतील इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. आगामी काळात शहर भाजपमध्ये मोठी उलथापालथ होणार असून भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर या पराभवाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कसबा मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५, १७, १८ हे संपूर्ण तर १६, १९ आणि २९ यांचा काही भाग येतो.

या मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वाधिक म्हणजे ७१ हजार ७५६ मतदार आहेत. आतापर्यंत भाजपने या मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५ मधील भागातून नगरसेवक झालेल्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली आहे. हेमंत रासने यांना उमेदवारी देताना प्रभाग क्रमांक १५ मधील नगरसेवक हा एक निकष लावला होता. कसब्यात २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये ४१ हजार ७७७ मतदान होऊन त्यापैकी सुमारे ६८ टक्के मते भाजपला मिळून २१ हजार २९ मतांचे मताधिक्य मिळविले होते. मात्र या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये हेमंत रासने यांना आघाडी मिळाली. पण मुक्ता टिळक यांना मिळालेले २१ हजार मताधिक्य मिळविण्यात रासने कमी पडले. या प्रभागातही धंगेकर यांना आघाडी मिळाली नाही. पण चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे धंगेकर हे मतमोजणीत सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवू शकले. या मतदारसंघातील सहा प्रभागामध्ये मिळालेल्या मताधिक्यावर आता भाजपमधील पालिकेतील इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. त्यात अनेकांचा पत्ता कट होणार आहे.

महापौर, स्थायी अध्यक्षपद, सभागहनेतेपद , १२ नगरसेवक असताना पराभव

कसबा विधानसभा मतदारसंघात १८ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवक भाजपचे आहेत. पालिकेतील पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात कसबा पेठ मतदारसंघाला अडीच वर्षे महापौरपद, तीन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि तब्बल दोन वेळा सभागृह नेतेपद आणि १२ नगरसेवक असताना बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपचा पराभव झाला. त्यामुळे शहर भाजपमध्ये उलथापालथ होणार आहे.

Web Title: Defeat despite 12 BJP corporators in Kasbay Impact on municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.