दीपक मानकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, २४ ऑगस्टपर्यंत येरवडा तुरुंगात रवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 07:06 PM2018-08-10T19:06:03+5:302018-08-10T19:08:35+5:30

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या  न्यायालयाने पोलीस कोठडीत २४ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Deepak Mankar's judicial custody extended up to 24th August | दीपक मानकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, २४ ऑगस्टपर्यंत येरवडा तुरुंगात रवानगी 

दीपक मानकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, २४ ऑगस्टपर्यंत येरवडा तुरुंगात रवानगी 

Next

पुणे : सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या  न्यायालयाने पोलीस कोठडीत २४ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. 

          सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांनी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व इतर आत्महत्येला जबाबदार असल्याचे लिहिले होते. यावरुन मानकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपक मानकर यांनी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला़ त्यानंतर मानकर मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेथे ३ खंडपीठाने त्यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. तेथेही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने १० दिवसांच्या आत पोलिसांसमारे हजर राहण्याचा आदेश दिला होता.

           शेवटी एक ऑगस्ट रोजी सकाळी ते लष्कर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांसमोर उपस्थित झाले. त्यांना रितसर अटक करुन न्यायालयात नेण्यात आले. विशेष न्यायाधीश ए़  एस़ महात्मे यांनी मानकर यांना ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत नेण्यात आले़.मात्र  त्याच रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले़  त्यामुळे त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल आले होते. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 

Web Title: Deepak Mankar's judicial custody extended up to 24th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.