विना पासिंग वाहन दिल्याने डिलर्सचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 07:56 PM2018-07-19T19:56:23+5:302018-07-19T20:04:32+5:30

विना पासिंग वाहने वितरीत केल्याप्रकरणी शहरातील तब्बल ११ वाहन वितरकांचा परवाना ७ दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

Dealer's license suspended because of giving no passing vehicle | विना पासिंग वाहन दिल्याने डिलर्सचा परवाना निलंबित

विना पासिंग वाहन दिल्याने डिलर्सचा परवाना निलंबित

Next
ठळक मुद्देआरटीओचा दणका : शहरातील ११ वाहन डिलरवर निलंबानाची कारवाईआरटीओची तपासणी पथकामार्फत अशा वाहनांची शोध मोहीम

पुणे : ग्राहकांच्या आग्रहाला बळी पडून विना पासिंग वाहने वितरीत करणे शहरातील वाहन डिलर्सला (वितरक) चांगलेच महागात पडले आहे. विना पासिंग वाहने वितरीत केल्याप्रकरणी शहरातील तब्बल ११ वाहन वितरकांचा परवाना ७ दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. 
केंद्रीय मोटार वाहन अधिनियमानुसार वाहनाची नोंदणी केल्याशिवाय वाहन चालविता येत नाही. असे वाहन वापरणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्याबाबत वाहन वितरक आणि ग्राहकांना देखील कल्पना असते. मात्र, शहरात विना क्रमांची वाहने सर्रास फिरताना दिसतात. आरटीओने यापूर्वी विना नोंदणीची वाहने जप्त करण्यात येतील असे जाहीर केले होते. 
विना पासिंग वाहन वापरल्याने वैयक्तिक आणि सामाजिक नुकसानीची कल्पना देऊनही या नियमाचे पालन करण्यात कसूर होत होती. या प्रकरणी वाजिद खान यांनी आरटीओकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही दखल न घेतल्याने खान यांनी आरटीओला वकीलामार्फत नोटीस बजावली होती. त्यानंतर आरटीओने तपासणी पथकामार्फत अशा वाहनांची शोध मोहीम हाती घेतली होती. त्यात आढळलेल्या विना पासिंगचे वाहनांच्या वितरकांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्या अकरा वाहन वितरकांचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत गायकवाड यांनी दिला. म्हणजे, या काळात त्यांना वाहन विकता येणार नाही. तसेच, विकलेल्या वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात होणार नाही. 
-------------
विना नोंदणी क्रमांकाचे वाहन रस्त्यावर चालविण्यास कायद्याने मनाई केली आहे. खरेतर यात ग्राहकांचाच फायदा आहे. नोंदणी क्रमांक नसलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास संबंधिताला विम्याचे आणि चोरीपासून होणाऱ्या नुकसानीचे संरक्षण मिळत नाही. तसेच, एखाद्या गुन्ह्यात अशा वाहनांचा वापर झाल्यास त्याचा तपास यंत्रणांना शोध घेणे अवघड जाते. या शिवाय असे वाहन वितरीत केल्यास संबंधित वितरकावर परवाना निलंबनाची कारवाई होते. पुन्हा असा गुन्हा केल्यास निलंबन कालावधी वाढविला जातो. त्यामुळे ग्राहक आणि वितरकांनी याचे भान राखले पाहिजे. 
संजय राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी 

 

Web Title: Dealer's license suspended because of giving no passing vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.