जन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत

By admin | Published: April 17, 2015 11:21 PM2015-04-17T23:21:34+5:302015-04-17T23:21:34+5:30

जुन्नर तालुक्यात बिबट्याने आज आणखी एका बालकाचा जीव घेतला. २00१ नंतर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चार तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात २४ जणांना ठार केले

Dangers of Junker taluka panic | जन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत

जन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत

Next

खोडद : जुन्नर तालुक्यात बिबट्याने आज आणखी एका बालकाचा जीव घेतला. २00१ नंतर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चार तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात २४ जणांना ठार केले
असून ८३ व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. यात सर्वाधिक जुन्नरमधीलच आहेत. आजच्या घटनेनंतर पुन्हा एकदा तालुक्यात दहशत पसरली आहे.
तालुक्यातील ओझर,
शिरोली, पिंपळवंडी, ठिकेकरवाडी, मंगरूळ, पारगाव, येडगाव, हिवरे बुद्रुक, हिवरे खुर्द, हिवरेतर्फे नारायणगाव, खोडद, रोहकडी, ओतूर,
शिरोली, सुलतानपूर, बोरी, साळवाडी, निमगाव सावा आदी गावांमध्ये बिबट्यांचा मोठा वावर आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून जनावरे व माणसांवर त्यांनी हल्ले
केले आहेत.
जुन्नर तालुक्यात ९ हजार हेक्टर सलग क्षेत्रामध्ये उसाचे पीक घेतले जाते. जसजशी उसाची वाढ होत जाते, त्यानंतर शेतकऱ्यांना अंतर्गत मशागत करणे शक्य होत नाही. यामुळे त्यांना ऊस म्हणजे एक प्रकारे सुरक्षाकवच मिळते.
या ठिकाणी असणारे पाणी, गारवा, लपण्यासाठी सुरक्षित जागा तसेच, शेळ्या, मेंढ्या, वासरे, ससे, कुत्रे यांसारख्या प्राण्यांना सहजपणे मिळणारे खाद्य यामुळे येथे बिबटे वास्तव्य करीत आहेत.
नोव्हेंबर ते मार्च हा ऊसतोड
हंगाम असतो. ऊस तुटून गेल्याने बिबट्यांची लपण कमी-कमी झाल्याने पर्यायाने पाणी व भक्ष्याच्या शोधात भटकंती करत ते मानवी वस्त्यांकडे येऊन हल्ले करतात.
जुन्नर वनविभागाकडे बिबटे पकडण्याचे एकूण ४० पिंजरे
असून, यापैकी २४ ते २५ सुस्थितीत आहेत. उर्वरित नादुरुस्त आहेत.
प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे प्रत्येकी ५ ते ६ पिंजरे उपलब्ध आहेत. (वार्ताहर)

४जुन्नर तालुक्यात सन १९९४ ते २००२ मध्ये बिबट्यांच्या मानवी हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
४२०१० ते १५ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात ४ ठार २७ जखमी झाले आहेत. त्यात सन २०१०-११ मध्ये ३ नागरिक ठार, तर २० जखमी झाले होते.
४सन २०१४-१५ मध्ये २ ठार, ४ जखमी झाले होते. १०९० जनावरे मारली गेली आहेत.

४मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना सन २००२ पासून २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत होती. सन २०१४ पासून नुकसान भरपाई जवळपास तिपटी ने वाढविण्यात आलेली आहे.
४मृत व्यक्तींच्या वारसांना २३,१३,९०० रुपये तर जखमी व्यक्तींच्या वारसांना ६,५९, ००८ रुपये देण्यात आलेले आहेत .
४पाळीव प्राण्यांच्या भरपाई पोटी वनविभागाकडून ६० लक्ष ६८ हजार ६१९ रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.

Web Title: Dangers of Junker taluka panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.