पुण्यातील या पेट्राेल पंपावर पेट्राेल साेबत मिळते थंडगार हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 07:39 PM2018-05-16T19:39:52+5:302018-05-16T19:39:52+5:30

पुण्यातील नवी पेठेतील एका भारत पेट्राेल पंपावर उन्हाच्या कडाक्यापासून थंडावा मिळण्यासाठी पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे.

customer get cold brezee on punes petrol pump | पुण्यातील या पेट्राेल पंपावर पेट्राेल साेबत मिळते थंडगार हवा

पुण्यातील या पेट्राेल पंपावर पेट्राेल साेबत मिळते थंडगार हवा

Next

पुणे : सध्या सर्वत्र पाऱ्याने चाळीशी पार केली अाहे. तळपत्या उन्हात नागरिकांच्या अंगाची लाहीलाही हाेत अाहे. त्यातच दुपारच्यावेळी बाहेर पडल्यास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. त्यामुळे दाेन मिनिक का हाेईना थंडावा मिळावा अशी नागरिकांची इच्छा असते. हीच नागरिकांची गरज लक्षात घेऊन पुण्यातील नवी पेठेतील एका पेट्राेल पंपावर पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. त्यामुळे दरराेज वाढणारी पेट्राेलची किंमत पाहून नागरिकांचा पारा वाढत असताना या गार वाऱ्यामुळे ताे कमी हाेण्यास मदत हाेत अाहे. 
    यंदाच्या उन्हाळ्यात पुण्याच्या पाऱ्याने चाळीशी पार केली हाेती. वाढत्या तापमानामुळे घराबाहेर पडणे नागरिकांना कठीण झाले हाेते. विशेषतः कामगार वर्गाचे बरेच हाल हाेत हाेते. हीच नागरिकांची समस्या लक्षात घेऊन नवीपेठेतील भारत पेट्राेल पंपचालकांना थेट नागरिकांसाठी पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पख्यांची साेय केली अाहे. उन्हातान्हातून पेट्राेल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना हा दाेन मिनिटांचा गारवा सुखावून जात अाहे. पाण्याचे तुषार उडविणाऱ्या दाेन पख्यांची व्यवस्था याठिकाणी केली असून सर्व ग्राहकांना या पंख्याची हवा लागेल याची विशेष खबरदारी घेण्यात अाली अाहे. याबाबत बाेलताना या पेट्राेलपंपाचे संचालक अनिष कर्वे म्हणाले, पेट्राेल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना काहीकाळ थंडावा मिळावा यासाठी या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. माझ्या बाबांची ही कल्पना हाेती. त्यानी एका हाॅटेलमध्ये या प्रकारचे पंखे पाहिले हाेते. अापल्या ग्राहकांसाठी सुद्धा अशी व्यवस्था करावी अशी कल्पना त्यांना सुचली. हे पंखे लावल्याने ग्राहकांना उन्हापासून दिलासा मिळत अाहे. अनेक वाहनचालक पेट्राेल भरल्यानंतर अावर्जुन ही व्यवस्था केल्याबद्ल अाभार मानतात. पावसाळा सुरु हाेईपर्यंत हे पंखे अाम्ही सुरु ठेवणार अाहाेत. 


    ग्राहकांबराेबरच येथील कर्मचाऱ्यांना सुद्धा या पंख्यांमुळे एसीमध्ये काम केल्यासारखे वाटते. तसेच  कामाचा कंटाळा येत नसून फ्रेश वाटत राहते. यंदा या उपक्रमाचे पहिलेच वर्ष असून पुढच्या वर्षीसुद्धा ही व्यवस्था करण्याचा या पेट्राेल पंप चालकांचा मानस अाहे.

Web Title: customer get cold brezee on punes petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.