महाराष्ट्रातून कोटी कोटी उड्डाणे; १७ वर्षांत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय-देशी विमान प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:37 PM2017-12-26T12:37:41+5:302017-12-26T12:53:44+5:30

गेल्या १७ वर्षांत सर्वाधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आघाडीवर असल्याची माहिती भारतीय विमान प्राधिकरणाने दिली आहे.

Crore crore flights from Maharashtra; Most international-indigenous aircraft travelers in 17 years | महाराष्ट्रातून कोटी कोटी उड्डाणे; १७ वर्षांत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय-देशी विमान प्रवासी

महाराष्ट्रातून कोटी कोटी उड्डाणे; १७ वर्षांत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय-देशी विमान प्रवासी

Next
ठळक मुद्देदेशांतर्गत प्रवासामध्ये राज्याने प्राप्त केले तब्बल १५ वर्षे अव्वलस्थानदेशात हवाई उड्डाणांच्या बाबतीत दिल्ली आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक झेपावत आहेत विमान

विशाल शिर्के
पुणे : देशात गेल्या १७ वर्षांत सर्वाधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आघाडीवर असल्याची माहिती भारतीय विमान प्राधिकरणाने दिली आहे. या कालावधीत देशांतर्गत प्रवासामध्ये राज्याने तब्बल १५ वर्षे अव्वलस्थान, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अकरा वर्षे अव्वलस्थान प्राप्त केले आहे. आता ती जागा देशाची राजधानी दिल्लीने घेतली आहे. 
देशात हवाई उड्डाणांच्या बाबतीत दिल्ली आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक विमान झेपावत आहेत. तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकातील तफावत ही निम्मी आहे. देशांत २०००-०१मध्ये देशांतर्गत उड्डाणांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७९ लाख ६१ हजार ९६३  प्रवाशांनी विमानसेवेचा वापर केला. त्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीतून ४९ लाख ८४ हजार १५७ प्रवाशांनी विमानसेवा वापरली होती. देशांतर्गत विमानसेवा वापरण्याची महाराष्ट्राची मक्तेदारी २०१५-१६पर्यंत कायम होती. राज्यातून २०१५-१६ मध्ये ३ कोटी ७२ लाख १५ हजार ६४९ प्रवाशांनी प्रवास केला. त्या वर्षी दिल्लीतून ३ कोटी ४२ लाख ७१ हजार ९९३ प्रवाशांनी विमान प्रवास केला. 
दिल्लीतून २०१६-१७ या वर्षांत ४ कोटी २२ लाख ५ हजार ७१२ प्रवाशांनी विमानसेवेचा वापर करीत राज्याची सर्वाधिक प्रवाशांची मक्तेदारी मोडून काढली. या वर्षी राज्यातून ४ कोटी १५ लाख ५ हजार ९०३ प्रवाशांनी वापर केला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटक राज्यातून २ कोटी ४३ लाख ३३ हजार ३९६ प्रवाशांनी विमानसेवा वापरली आहे. 

देशांतर्गत विमान प्रवासातील अव्वल राज्य

राज्य२००१-०२२००५-०६२०१०-११२०१५-१६२०१६-१७
महाराष्ट्र७९,६१,९६३१,३१,९४,२७८  २,४३,७७,७७६३,७२,१५,६४९४,१५,०५,९०३
दिल्ली४९,८४,१५७१,०४,६८,०२८२,०६,६७,११३३,४२,७१,९९३४,२२,०५,७१२
कर्नाटक२४,८७,८३१५१,३६,१३२ १,००,५१,१३९ १,६७,८०,३१०२,०४,३३,३९६
तमिळनाडू२६,०२,८८६४९,४०,८८१९४,६८,२६०१,२७,२१,७६९१,६१,०१,१००
पश्चिम बंगाल२१,४९,२५३३८,७२,१३५८८,५६,५७० १,१६,६४,१६५१,५०,९४,४९०
आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांतील अव्वल राज्य    
राज्य२००१-०२२००५-०६२०१०-११२०१५-१६२०१६-१७
महाराष्ट्र५१,७४,७१६६७,६७,३४४९१,७५,२०२१,१९,४२,०९०१,२८,१०,३९७
दिल्ली३९,४९,६०३ ५७,६६,६७३९२,७५,७७४१,४१,५२,१७२१,५४,९७,३८४
केरळ१३,५९,२६१ २९,२६,८४४ ६०,३१,१५५ ८८,६७,६२५ ९५,२१,३७४
तमिळनाडू१८,९५,९४४ २७,८१,३६० ५०,१५,४२७६४,१९,३०४६८,०६,८०५
पश्चिम बंगाल६,३१,५५८७,४२,२५० १४,४९,५८७२१,९२,५९६२२,५५,५१५


 

Web Title: Crore crore flights from Maharashtra; Most international-indigenous aircraft travelers in 17 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.