'मॅरेथॉनविषयक युवकांमध्ये सकारात्मकता गरजेची'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 03:03 AM2019-02-01T03:03:41+5:302019-02-01T03:04:09+5:30

सर्वस्तरीय सहभागाशिवाय परिपूर्णता नाही; पुणे रनिंगने लोकमत मॅरेथॉनला दिल्या शुभेच्छा

'Critical need of marathon youth' | 'मॅरेथॉनविषयक युवकांमध्ये सकारात्मकता गरजेची'

'मॅरेथॉनविषयक युवकांमध्ये सकारात्मकता गरजेची'

Next

पुणे : मुंबईसारख्या शहरात पार पडणा-या मँरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग दिसून येतो. त्यातुलनेत इतर शहरांमधील प्रतिसाद बघता अद्याप मँरेथॉनविषयी नागरिकांची मानसिकता बदलणे महत्वाचे आहे.

स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात स्वत:चे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे आव्हानात्मक असताना सुदृढ स्वास्थ्याकरिता उपलब्ध असणा-या पर्यायांचा विचार करुन त्यात सहभागी होणे गरजेचे आहे. मँरेथॉनबाबत मोठ्या प्रमाणात सकारात्मता तयार झाल्यास त्याचा फायदा सर्वांना होईल. असे मत ‘पुणे रनिंग’च्या पदाधिका-यांनी व्यक्त केले.

‘पुणे रनिंग’ने लोकमत महामँरेथॉनला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पुणे रनिंगचे संचालक संदीप कोल्हटकर, प्रीती आरवडे, राकेश मेहता, नवीन सिंग आदी उपस्थित होते. लोकमतचे संपादक प्रशांत दिक्षीत यांनी त्यांचे स्वागत केले. मँरेथॉन आणि त्याबद्द्लच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी पुणे शहरातील गेल्या काही वर्षांपासून सुरु झालेले मँरेथॉन कल्चर त्यातुलनेने देशातील इतर शहरांमधील मोठ्या प्रतिसादात सुरु असणा-या मँरेथॉन याकडे लक्ष वेधले. कोल्हटकर म्हणाले, मँरेथॉनमध्ये प्रामुख्याने धावणारा वयोगट २० च्या पुढचा आहे. पुण्यात व उपनगरांमध्ये काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उत्साहाने मँरेथॉन पार पडत असून तरुणाईचा त्यात लक्षणीय सहभाग आहे. मात्र तो आणखी गंभीरतापूर्वक वाढावा यासाठी पुरेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा म्हणून मँरेथॉनकडे पाहिले जाते. याबद्द्ल आवश्यक ती माहिती, मार्गदर्शन, पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा, खेळाडूंना आकर्षित करणारी पारितोषिके यांचा प्रभावीपणे उपयोग करता येणे महत्वाचे आहे. भविष्यात आपल्याकडे मँरेथॉन नावाची संस्कृती टिकवायची असल्यास त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे लागणार आहे.

प्रीती आरवडे म्हणाल्या, इतर स्पर्धांच्या तुलनेने मँरेथॉनकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. इतर क्रीडाप्रकारांकडे ज्या संख्येने तरुणाईची पसंती असते त्यातुलनेने मँरेथॉनला दिसून येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. यापेक्षा आयटी सेक्टरमधील तरुणाईचा कल मँरेथॉनकडे असल्याचे दिसून येत आहे. हे समाधानकारक चित्र म्हणावे लागेल.

पुण्यासारख्या शहरात भविष्यात उत्साहाने मँरेथॉन स्पर्धा पार पडणाकरिता माध्यमांबरोबरच नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असणार आहे. कारण मँरेथॉन हा एक टेÑंड बनतो आहे. त्याची लोकप्रियता देखील वाढत आहे.

निरोगी आरोग्याकरिता धावणे किती महत्वाचे आहे यासाठी मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे तरुणांमध्ये धावण्याविषयीची जी एकप्रकारची नकारात्मकता आहे ती दूर करुन त्यांना उत्साहाने मँरेथॉनमध्ये सहभागी करुन घेणे आव्हानात्मक असणार आहे. असे मत मेहता यांंनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: 'Critical need of marathon youth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.