पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:20 AM2021-06-11T10:20:24+5:302021-06-11T12:13:09+5:30

सोमवार पासून दुकाने ६ पर्यंत तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मात्र बंधने कायम

Consolation to Pune residents? Decision to relax restrictions further | पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम

पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम

Next

कोरोना मध्ये अनेक दिवस लॉकडाऊन मध्ये राहिलेल्या पुणे शहराला अखेर दिलासा मिळणार आहे. पुणे शहरासाठीचे निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात हे पुढील दोन दिवस जर पॉझिटिव्हिटी ५ टक्क्यांचा आत राहिला तरच हा दिलासा दिला जाईल असे अजित पवार यांनी जाहीर केले. दरम्यान पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मात्र पॉझिटिव्हिटी कमी न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेंड लॉकडाऊन देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना आढावा बैठक घेतली.त्यावेळी फक्त पुणे शहरातील निर्बंध शिथिल कार्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही आठवडयांमध्ये पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
पुणे शहरात आता दुकाने संध्याकाळी ७ पर्यंत उघडी राहणार आहेत. या बरोबरच हॉटेल देखील रात्री १० पर्यंत सुरू राहतील.मॉल ५०% क्षमतेने सुरू राहतील तर थिएटर मात्र बंद राहणार आहेत. तसेच अभ्यासिका ग्रंथालये देखील ५०% क्षमतेने सुरू ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.सोमवारी १३ तेरा तारखेपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 
"पुढील दोन दिवस पॉझिटिव्हिटी रेट किती आहे हे पाहिलं जाईल.त्यानंतर जर हाच ट्रेण्ड कायम राहिला तर सोमवार पासून नवीन आदेशांची अंमलबजावणी होईल."

Web Title: Consolation to Pune residents? Decision to relax restrictions further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.