‘ती’चा गणपतीला आयुष्यमान, नीना गुप्ताची बधाई !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 02:59 AM2018-09-19T02:59:28+5:302018-09-19T02:59:51+5:30

‘लोकमत’ला उद्या भेट; आरती करणार, महिलांशी साधणार संवाद

Congratulations to Tina's life, Nina Gupta! | ‘ती’चा गणपतीला आयुष्यमान, नीना गुप्ताची बधाई !

‘ती’चा गणपतीला आयुष्यमान, नीना गुप्ताची बधाई !

googlenewsNext

पुणे : महिला सक्षमीकरणाची चळवळ बनलेल्या ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपती उपक्रमाला ‘बधाई हो’ म्हणण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता गुरुवारी पुण्यात येणार आहेत. ‘ती’चा गणपती मंडळाच्या गणेशाची आरती करून महिलांशी संवाद साधणार आहेत.
‘विकी डोनर’पासून ते ‘हवाईजादा’पर्यंत आपल्या नैसर्गिक अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा आयुष्यमान आणि ‘साथ साथ’, ‘मंडी’, ‘उत्सव’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनय ताकदीचे दर्शन घडविताना वैयक्तिक जीवनातही क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या नीना गुप्ता यांच्याशी संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. ‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव आणखी समाजाभिमुख झाला. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ देणारी ‘ती’चा गणपती ही एक चळवळ बनली आहे. ‘बधाई हो’ चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्यमान खुराणा आणि नीना गुप्ता हे ‘ती’चा गणपती मंडळाचे दर्शन घेणार आहेत.
जंगली पिक्चर्स आणि क्रोम पिक्चर्सच्या बॅनरखालील विनित जैन, अलिया सेन, हेमंत भंडारी आणि अमित शर्मा यांची निर्मिती असलेल्या ‘बधाई हो’ हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शक असून, आयुष्यमान आणि नीना गुप्ता यांच्याबरोबरच सान्या मल्होत्राही झळकत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विनोदी धाटणीचा कौटुंबिक चित्रपट म्हणून प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Web Title: Congratulations to Tina's life, Nina Gupta!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.