बदलत्या काळात ‘कॉम्प्युटर सिंड्रोम’चा धोका -डॉ. वर्धमान कांकरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:37 AM2018-06-12T03:37:37+5:302018-06-12T03:37:37+5:30

भारतासारख्या देशात आता तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढत आहे. आयटीच्या युगात सातत्याने विविध बदल होत असून, त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी शरीरावर झाला आहे. कॉम्प्युटरवर दीर्घ काळ काम करून डोळ्यांच्या विकारांत वाढ होत असतानाचे चित्र दिसून येते.

 Computer Syndrome risk - Dr. Vardhaman Konarkaria | बदलत्या काळात ‘कॉम्प्युटर सिंड्रोम’चा धोका -डॉ. वर्धमान कांकरिया

बदलत्या काळात ‘कॉम्प्युटर सिंड्रोम’चा धोका -डॉ. वर्धमान कांकरिया

googlenewsNext

पुणे : भारतासारख्या देशात आता तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढत आहे. आयटीच्या युगात सातत्याने विविध बदल होत असून, त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी शरीरावर झाला आहे. कॉम्प्युटरवर दीर्घ काळ काम करून डोळ्यांच्या विकारांत वाढ होत असतानाचे चित्र दिसून येते. यामुळे डोळ्यांमधील कोरडेपणा वाढणे, डोकेदुखी, अतिरिक्त ताण यांत वाढ होते. यालाच ‘कॉम्प्युटर सिंड्रोम’ असे म्हणतात. बदलत्या काळात या विकाराचा धोका असल्याची भीती प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांनी व्यक्त केली.
हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी, स्त्रीशक्तीच्या उद्गात्या व आध्यात्मिक विचारवंत पानकुंवर फिरोदिया यांच्या ३१व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला रेटिना व मधुमेही नेत्रविकार विशेषज्ञ डॉ. श्रुतिका कांकरिया, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, डॉ. जयश्री फिरोदिया, डॉ. शांता कोटेचा उपस्थित होत्या.
‘नेत्रविकार व आधुनिक उपचार’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना डॉ. कांकरिया म्हणाले, ‘‘भारतासारख्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात नेत्रदानासंबंधी मोठ्या प्रमाणावर अज्ञान दिसून येते. दर वर्षी आपल्या देशात १६ हजार नेत्रदान होते. याउलट, आपल्यापेक्षा आकाराने छोट्या असलेल्या श्रीलंका या देशातून होणारे नेत्रदान लक्षणीय आहे.
‘‘दर वर्षी नेत्रदानाची गरज वाढत असताना त्यामानाने होणारे नेत्रदान कमी आहे. दर वर्षी १ लाख डोळ्यांची गरज देशाला आहे. त्यातुलनेत होणारे नेत्रदान अत्यल्प आहे.
दुसऱ्या बाजूला संगणकावर आधारित कामांचे प्रमाण वाढल्याने त्याचा गंभीर परिणाम पूर्ण जीवनशैलीवर झाला आहे.’’

डोळा शरीरातील महत्त्वाचा अवयव असताना सध्याच्या पिढीने डोळ्यांच्या जपणुकीकरिता निष्काळजीपणा करू नये. लॅन्सिक ही सध्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेकरिता अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया असून या लेझर तंत्राच्या साह्याने करता येणाºया शस्त्रक्रियेच्या माध्यमातून डोळ्यांच्यासंंबंधी आजारांचे निराकरण करणे सोपे जाते. या प्रसंगी अरुण फिरोदिया यांनी आर्इंच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.

डोळ्यांवरील त्याच्या प्रतिकूल परिणामाकरिता संगणकावर काम करणाºयांनी ‘रुल २०’चे पालन करावे. यात संगणकावर २० मिनिटे काम केल्यानंतर २० सेकंदांची विश्रांती घ्यावी. तसेच २० फूट अंतरावरील परिसरावर नजर फिरवावी आणि २० वेळा डोळ्यांची उघडझाप करावी. अशा या रुल २० चे पालन केल्यास या कॉम्प्युटर सिंड्रोमचा धोका कमी होईल. डोळ्यांचे महत्त्व विशद करताना कांकरिया यांनी विविध उदाहरणांचा दाखला दिला. ८० टक्के ज्ञान आपण डोळ्यांच्या साह्याने ग्रहण करतो.

वेळेत उपचार महत्त्वाचे
वाढत्या वयाचे नेत्रविकार व त्यावरील उपाय यावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. श्रुतिका कांकरिया म्हणाल्या, की भारतीय रुग्ण आणि त्यांच्या मानसिकतेविषयी सांगायचे झाल्यास ते आजारांबाबत फारसे गंभीर नसल्याचे पाहावयास मिळते.
जाणीवपूर्वक आजाराकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर परिस्थिती ओढवते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ८० टक्के अंधत्व हे पडदा व नसांच्या आजाराने होते. यावर वेळेत उपचार करणे गरजेचे आहे.

Web Title:  Computer Syndrome risk - Dr. Vardhaman Konarkaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.