बालेकिल्ल्यातच ‘बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:27 AM2018-09-11T01:27:23+5:302018-09-11T01:27:38+5:30

इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १0) विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच संमिश्र प्रतिसाद मिळाला.

A composite response to 'Close' in the Citadel | बालेकिल्ल्यातच ‘बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

बालेकिल्ल्यातच ‘बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

Next

बारामती : इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १0) विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवित निषेध व्यक्त केला. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांनी ‘भारत बंद’पासून दूर राहणेच पसंत केले. राष्ट्रवादीच्याच बालेकि ल्ल्यात बंदला मिळालेला संमिश्र प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला. केवळ कसबा, मारवाड पेठ, दुकाने बंद ठेवून बंद पाळण्यात आला. सिनेमा रोडसह मुख्य बाजारपेठेत दुकाने दुकाने सुरुच होती.
तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीचा जाहीर निषेध करण्यात आला. तहसीलदार हनुमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, पंचायत समिती सभापती संजय भोसले, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अ‍ॅड. राजेंद्र काटे, राजेंद्र रायकर, उपसभापती शारदा खराडे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, संपत काटे, सुभाष सोमाणी, नगरसेवक समीर चव्हाण, अमर धुमाळ, राहुल भापकर, धनवान वदक, वनिता बनकर, अनिता गायकवाड, आरती शेंडगे, अनिल गायकवाड, राहुल वाबळे, राहुल कोकरे,सुनील बनसोडे, उपाध्यक्ष अनिल जाधव आदी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील बंदमध्ये सहभाग घेतला. दर लक्षात घेता मोदींचे अच्छे दिन येण्याआधीचेच दर पूर्ववत व्हावे, असे मत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विनोद जावळे, अ‍ॅड. नीलेश वाबळे, मंगेश गिरमे, हसन शेख, बिलाल बागवान, अमोल गालिंदे, अ‍ॅड. भार्गव पाटसकर, प्रवीण धनराळे,हृषीकेश पवार, शुभम भंडारे, चंद्रकांंत भोसले उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने अ‍ॅड. आकाश मोरे आंदोलनात सहभाग घेतला.
>अजित पवार यांच्या आवाहनानंतरदेखील संमिश्र प्रतिसाद...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राज्य सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी आयोजित भारत बंदमध्ये सगळ्या नागरिकांनी सहभागी व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात बंदमध्ये सहभागी होणार आहे, असे आवाहन बारामती येथे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. ९) पत्रकारांशी बोलताना केले होते. पवार येथील विविध संस्थांच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते. मात्र, आजच्या बंदला मिळालेला प्रतिसाद पाहता राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या केवळ पदाधिकाºयांनी बंदमध्ये सहभाग घेऊन निषेध व्यक्त के ला. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसह बहुतांश व्यावसायिक व्यापाºयांनी पवार यांच्या बंदच्या केलेल्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने येथे १०० टक्के प्रतिसाद मिळणे अपेक्षत होते. मात्र, नेत्यांनी आवाहन करूनदेखील मिळालेला संमिश्र प्रतिसाद शहरात चर्चेचा विषय होता.
>मनसे कार्यकर्त्यांची दगडफेक बसवर दगडफेक

दौंड : भाजपा सरकारने केलेलल्या पेट्रोल, डिझेल वाढीच्या निषेर्धात काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मनसेच्या काही कार्यकरतयांनी दौंड-सिध्दटेक बसवर दगडफेक केल्याने एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला.
याप्रकरणी मनसेच्या सचीन कुलथे, सागर पाटसकर, जमीर सय्यद, अझर कुरेशी या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा काँग्रेसचा संबंध नसल्याचा निवार्ळा दौंड शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबा शेख यांनी दिला आहे. एसटी चालक शिवाजी होले यांनी फिर्याद दिली आहे.
होले हे सकाळी सिध्दटेक येथून दौंडकडे येण्यासाठी निघाले होते. बसमध्ये विद्यार्थी आणि प्रवासी होते. दरम्यान, येथील संभाजी स्तंभा जवळ विद्यार्थी व प्रवासी उतरले. तर तीन विद्यार्थी आणि दोन प्रवासी बसमध्ये बसलेले होते. बस पुढे डेपोत जायला निघाली तेव्हा येथील शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाच्या परिसरात मनसेचे पाच ते सात कार्यकर्ते आले. यावेळी होले यांच्या परिचयाच्या सचीन कुलथे याने त्याच्या हातातील दगड बसच्या काचेवर मारला. हा दगड बसमध्ये आत पडला. त्यानंतर त्याच्या हातात असलेल्या बांबूने दुसरी काच फोडली. या घटनेमुळे एक विद्यार्थी जख्मी झाला असून तो ११ वीच्या घटक चाचणीच्या शेवटच्या पेपरला निघाला होता. जखमी अवस्थेतही त्याने महाविद्यालयात जाऊन परिक्षा दिली.

Web Title: A composite response to 'Close' in the Citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.