पुणे शहरात ‘ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 08:20 PM2018-09-10T20:20:48+5:302018-09-10T20:31:05+5:30

राज्यभरात पेट्रोलदरवाढीचा भडका उडाला असताना त्याच्या निषेधार्थ देशभरात विरोधी पक्षांकडून ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली होती.

Composite response to 'Bharat Bandh' in Pune city | पुणे शहरात ‘ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

पुणे शहरात ‘ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वपक्षीय सहभाग : बसेसच्या तोडफोड ऐवजी हवा सोडलीकाही शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला तर अनेक शाळांचे वर्ग नियमितपणाने सुरु अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबागेत मात्र गर्दी

पुणे : राज्यभरात पेट्रोलदरवाढीचा भडका उडाला असताना त्याच्या निषेधार्थ देशभरात विरोधी पक्षांकडून ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली होती. त्यानिमित्त सोमवारी (दि.१०) शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बंदमध्ये सर्वपक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. बंदला काही ठिकाणी लागलेले हिंसक वळण वगळता अन्य ठिकाणी शांततामय वातावरणात बंद पार पडला. 
पेट्रोलचा सातत्याने वाढत जाणारे दर यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. महागाईने नागरिकांची डोकेदुखी वाढत चालली असताना ती दूर करण्यासाठी सरकारकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. यामुळे सरकारला जाग यावी, तसेच त्यांना जाब विचारण्यासाठी ’’भारत बंद’’ पुकारण्यात आला होता. सरकारी कार्यालये मात्र नियमित सुरु होती. याशिवाय काही शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला तर अनेक शाळांचे वर्ग नियमितपणाने सुरु असल्याचे पाहवयास मिळाले. बाजारपेठांमधील सर्व व्यवहार ठ्प्प होते. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबागेत मात्र गजबजाट होता. खरेदीकरिता गर्दी होती. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यांवरील दुकाने बंद होती. शनिवार, नारायण, रविवार पेठेतील दुकानदारांनी दुकाने अर्धवट बंद करुन  त्यास पाठींबा दिला. सजावटीच्या सामानाकरिता रविवार पेठेतील बोहरी आळीत देखील खरेदीसाठी तुरळक स्वरुपात गर्दी होती. 
जंगली महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्त्यांवरील अनेक पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. उपनगरांमध्ये देखील बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरात बंद मध्ये विविध राजकीय पक्ष सहभागी झाले होते. त्यांनी याप्रसंगी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणा व निदर्शंने केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंदला पाठींबा दर्शवत त्यात सक्रिय सहभाग नोंदवला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसेसची हवा सोडून देवून आपला राग व्यक्त केला. यासगळ्यात ’’तब्बल 12 वेळा केली पेट्रोल -डिझेलच्या दरात उत्पादन शुल्कवाढ, चार वर्षात केली जनतेकडून अकरा लाख कोटींची लूट. पुणेकरांनो आपण गप्प का? पुणे कॉग्रेसकडून शहरभरात लागलेल्या या निषेधाचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. दरवाढीच्या निषेधार्थ कॉग्रेस कार्यकर्त्यांनी मंडईत टांग्यातून प्रवास क रत निषेध व्यक्त केला. 

*  फर्ग्युसन रस्त्यावर शुकशुकाट 
एरवी प्रचंड वाहतूकीच्या रहदारीमुळे गजबजाट असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर सोमवारी शुकशुकाट दिसून आला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याशिवाय खानपानाकरिता या रस्त्यावरील वेगवेगळ्या उपहारगृहांमध्ये गर्दी करणा-या तरुणाईला मात्र सोमवारी कडकडीत बंदला सामोरे जावे लागले. अत्यावश्यक सोयीसुविधेची सेवा उपलब्ध करुन देणारी औषधविक्रीची दुकाने वगळता इतरांनी बंदमध्ये सहभाग घेतला.  

Web Title: Composite response to 'Bharat Bandh' in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.