रिळांची रासायनिक तपासणी पूर्ण, लघुपटांचेही संवर्धन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात खराब रिळांची शासन मान्यतेनंतर विल्हेवाट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:35 AM2017-09-15T03:35:17+5:302017-09-15T03:35:29+5:30

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सध्या सुमारे दीड लाख रिळे उपलब्ध आहेत. एक वर्षापूर्वी हाती घेतलेल्या डिजिटायझेशन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्णत्वाला जात आहे. रिळांची रासायनिक तपासणी पूर्ण झाली असून, त्यांची अवस्था तपासण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या तपासणीसाठी चेन्नई तसेच इटलीतील चित्रपट प्रयोगशाळांना पाचारण करण्यात आले आहे.

 Complete the chemical check of RIL, the promotion of the short film, the disposal of the Bad Rai government after the approval of the National Film Museum | रिळांची रासायनिक तपासणी पूर्ण, लघुपटांचेही संवर्धन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात खराब रिळांची शासन मान्यतेनंतर विल्हेवाट  

रिळांची रासायनिक तपासणी पूर्ण, लघुपटांचेही संवर्धन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात खराब रिळांची शासन मान्यतेनंतर विल्हेवाट  

googlenewsNext

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सध्या सुमारे दीड लाख रिळे उपलब्ध आहेत. एक वर्षापूर्वी हाती घेतलेल्या डिजिटायझेशन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्णत्वाला जात आहे. रिळांची रासायनिक तपासणी पूर्ण झाली असून, त्यांची अवस्था तपासण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या तपासणीसाठी चेन्नई तसेच इटलीतील चित्रपट प्रयोगशाळांना पाचारण करण्यात आले आहे.
राष्टÑीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने चित्रपटांच्या रिळांच्या संवर्धनासाठी डिजिटायझेशनचा पाच वर्षांचा प्रकल्प ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. यांअतर्गत दुर्मिळ चित्रपट रिळांचे जतन-संवर्धन करण्यात येत आहे. यामध्ये तपासणी, स्थितीनुसार अ, ब आणि क अशी वर्गवारी, जतन आणि संवर्धन, डिजिटायझेशन, तांत्रिक पर्याय, स्टोअरेज क्षमता वाढवणे आदी टप्प्यांमध्ये प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पास सुरुवात करण्यापूर्वी देशभरातील संग्रहालये, संस्था, प्रयोगशाळा, चित्रपट क्षेत्राशी संबंधित जाणकार, संशोधक यांच्या देशभरात आठ कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर टेंडर तयार करून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तपासणी आणि संवर्धनानंतर वॉल्टची तपासणी केली जाणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये संवर्धनाचे काम पूर्ण होणार असून, डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोल्ड स्टोअरेजचीही काटेकोरपणे तपासणी केली जात आहे, अशी माहिती संतोष अजमेरा यांनी दिली.

रिळांच्या संवर्धनासह ४००० लघुपट आणि फिचर फिल्मचे जतन करण्यावर भर देण्यात येत आहे. शनल फिल्म हेरिटेज मिशनअंतर्गत सध्या चित्रपटांच्या जतानाचे काम वेगाने सुरू आहे. या मिशन अंतर्गत आम्ही विविध संस्था, व्यक्तींना त्यांच्याकडील लघुपट तसेच चित्रपटांचा दुर्मिळ वारसा एनएफएआयकडे सुपूर्त करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संवर्धनासाठी देशभरातील तसेच देशाबाहेरील चित्रपटतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असून, त्यानुसार ८-९ प्रकारचे प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहेत.
- प्रकाश मगदूम, संचालक, एनएफएआय

सध्या संग्रहालयाची स्टोअरेज क्षमता मर्यादित आहे. संग्रहालयात केवळ १९ वॉल्ट उपलब्ध आहेत. यामध्ये ३० टक्के आर्द्रता आणि २ अंश सेल्शिअस तापमानाला फिल्म जतन केल्या जातात. संग्रहालयातील रिळांची चित्रपट जाणकारांकडून तपासणी करण्यात आली असून, खराब रिळे वेगळी करण्यात आली आहेत. या रिळांच्या सुस्थितीतील प्रती संग्रहालयाकडे उपलब्ध आहेत. खराब रिळांची शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर विल्हेवाट लावली जाणार आहे. या रिळांच्या सुस्थितीत असलेल्या प्रती संग्रहालयाकडे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. खराब रिळेही विशिष्ट तापमानात ठेवण्यात आली आहेत.
- संतोष अजमेरा, विशेष कार्य अधिकारी, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन

डिजिटायझेशन केलेले चित्रपट पुन्हा रीळ स्वरूपात विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पुढील अनेक वर्षे चित्रपटांचे जतन होण्यास उपयुक्त ठरणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने साकारलेला
हा प्रकल्प जगातील एकमेव ठरणार असून, जागतिक स्तरावरदेखील मार्गदर्शक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

संग्रहालयामध्ये सुमारे
१०००
नायट्रेट फिल्म रिल्स आहेत. बराच मोठा कालावधी लोटल्यामुळे रिल्सचे रासायनिक प्रक्रियेमुळे तसेच भौैतिक नुकसान होत आहे.

ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी
अशा प्रकारच्या नुकसानापासून चित्रपटांचा ऐतिहासिक ठेवा जपता यावा, यासाठी रिल्सची तपासणी, दुरुस्ती आणि संवर्धन करण्यात
येत आहे.

डिजिटायझेशन झालेले चित्रपट पुन्हा होणार जतन

सध्या एनएफएआयमध्ये १८ ते २० हजार चित्रपट संग्रहित आहेत. या चित्रपटांचे १ लाख ३० हजार अधिक रिळे जतन करून ठेवण्यासाठी प्रकल्प राबवण्यात आला आहेत. डिजिटायझेशन झालेले चित्रपट पुन्हा नव्याने जतन करण्यात येणार आहेत.

Web Title:  Complete the chemical check of RIL, the promotion of the short film, the disposal of the Bad Rai government after the approval of the National Film Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.