CM used me ; alligation by MP Sanjay Kakde after meeting Ajit Pawar | भाऊ मानलेल्या मुख्यमंत्र्यांनीच लाथाडलं, संजय काकडेंची खंत ; घेतली अजित पवारांची भेट
भाऊ मानलेल्या मुख्यमंत्र्यांनीच लाथाडलं, संजय काकडेंची खंत ; घेतली अजित पवारांची भेट

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भाऊ मानले. मात्र याच भावाने मला लाथाडलं असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुण्यात दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यावर काकडे यांनी हे विधान केल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

           याबाबत अधिक माहिती अशी की, काकडे यांना पुण्यातून लोकसभेची जागा लढवण्यात रस आहे अशी माहिती त्यांनी यापूर्वीच दिली आहे. त्यासाठी भाजपकडून त्यांना अजूनतरी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे काकडे यांनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केली असून पवार यांची भेट त्यासाठी महत्वाची मानली जाते.  याच कारणांसाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. 

          आता अजित पवारांची भेट घेतल्यावर ते म्हणाले की, मी गेल्या काही दिवसांपासून भ्रमिष्टासारखा वागत होतो. मात्र भाजपने माझा वापर केला. मुख्यमंत्री मला भावासारखे मात्र याच भावाने लाथ मारल्यावर दुसरे घर शोधावे लागत आहे. पुण्यात अजित पवार यांचे मोठे वजन असल्यामुळे त्यांना भेटायला आलो असल्याचेही ते म्हणाले. भाजपमध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अत्यंत वाईट वागणूक दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. 


Web Title: CM used me ; alligation by MP Sanjay Kakde after meeting Ajit Pawar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.