सीएम चषक स्पर्धा : प्रथमेश पैठणकर, यमुना लडकतला दुहेरी मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:28 AM2018-12-29T01:28:50+5:302018-12-29T01:29:03+5:30

भारतीय जनता युवा मोर्चा कसबा पेठ यांच्या वतीने आयोजित केलेल्या सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळात प्रथमेश पैठणकर व यमुना लडकत यांनी अनुक्रमे मुला-मुलींच्या गटात दुहेरी मुकुट संपादन केला.

 CM Cup competition: Prathamesh Paithankar, Yamuna Ladaktala double crown | सीएम चषक स्पर्धा : प्रथमेश पैठणकर, यमुना लडकतला दुहेरी मुकुट

सीएम चषक स्पर्धा : प्रथमेश पैठणकर, यमुना लडकतला दुहेरी मुकुट

Next

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा कसबा पेठ यांच्या वतीने आयोजित केलेल्या सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळात प्रथमेश पैठणकर व यमुना लडकत यांनी अनुक्रमे मुला-मुलींच्या गटात दुहेरी मुकुट संपादन केला.
सणस मैदानावर झालेल्या उडान मैदानी स्पर्धेत १०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलांच्या गटात प्रथमेश पैठणकर व मुलींच्या गटात यमुना लडकत यांनी प्रथम क्रमांक जिंकला. शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेत महिलांच्या गटात राजा शिवछत्रपती क्रीडा संस्था संघाने विजेतेपद जिंकले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडला. या वेळी महापौर मुक्ता टिळक, मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, नगरसेवक हेमंत रासने, महेश लडकत, सम्राट थोरात, दीपक पोटे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, मनीषा लडकत, गायत्री खडके, भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष स्वरदा बापट, शहराचे सरचिटणीस उज्ज्वल केसकर उपस्थित होते.
या स्पर्धेमधील विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील, असे प्रचारप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले.
निकाल पुढीलप्रमाणे :
इंद्रधनुष्य : चित्रकला : आर्यमान पंजाबी, दीपाली राव, साई पंडित. मेक इन इंडिया : रांगोळी : मेधा राजेंद्र बेलवडकर, भाग्यश्री साळवी, महेंद्र मेटकरी, मयूर दुधाळ, पूनम पोटे, सचिन साळवे.
जलयुक्त शिवार : व्हॉलिबॉल (पुरुष विभाग) : अक्षय स्पोर्ट्स क्लब, एम. एस. स्पोर्ट्स क्लब. (महिला विभाग) : के.एस.एस. राठी, एम.एस. स्पोर्ट्स क्लब.
उडान : अ‍ॅथलेटिक्स (१०० मीटर) (पुरुष विभाग) : प्रथमेश पैठणकर, समीर मुतालिक, मुसळेराम रामकृष्ण. (१०० मीटर) (महिला विभाग) : यमुना लडकत, साक्षी पागनीस, सिद्धी जाधव. (४०० मीटर) (पुरुष विभाग) : प्रथमेश पैठणकर, गणेश पांडे, मोहंमद मुजावर. (महिला विभाग) : यमुना लडकत, सिद्धी जाधव, तन्वी गोडसे.
शेतकरी सन्मान : कबड्डी (पुरुष विभाग) : नूमवि कबड्डी संघ, सरस्वती क्रीडा संघ. (महिला विभाग) : राजा शिवछत्रपती क्रीडा संस्था, राजमाता जिजाऊ संघ.
आयुष्यमान क्रिकेट स्पर्धा (पुरुष विभाग) : श्रमिक पत्रकार संघ, पुणे, व्हीकेसीसी, स्वराज्य ग्रुप.
उज्ज्वला : डान्स स्पर्धा ग्रुप डान्स : क्युझेटीक्स किंग्ज ग्रुप, शिवांजली ग्रुप, जी अँड डी डान्स ग्रुप. उज्ज्वला : डान्स स्पर्धा सोलो डान्स : कार्तिक राणे, प्रणाली शितोळे, आर्या कोकाटे.
उजाला : गायन स्पर्धा : पूर्वी बौराल, हर्षद देसाई, प्रमोद डाऊर, सिद्धार्थ कुंभोजकर. कौशल्य भारत : कॅरम स्पर्धा (पुरुष विभाग) : अनिल मुंडे, नईम शेख, योगेश कसबे. (महिला विभाग) : पुष्कनी भट्टड, ऋतुजा मराठे.

‘खेळ’ हा आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देतो त्यामुळे खेळास प्राधान्य देऊ
-गिरीश बापट .

Web Title:  CM Cup competition: Prathamesh Paithankar, Yamuna Ladaktala double crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे