शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 04:18 PM2018-02-19T16:18:10+5:302018-02-19T16:18:36+5:30

तुळजापूर येथील राजे शहाजी प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ६५ स्वराज्यरथ...

Chhatrapati Shivaji Maharaj's great tribute to Sardar's descendants, helicopter to flowers | शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

googlenewsNext

पुणे : तुळजापूर येथील राजे शहाजी प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ६५ स्वराज्यरथ... महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना... ५१ रणशिगांची ललकारी... शिवगर्जना ढोलताशा पथकाचा रणगजर... सनई-चौघडयांचे मंगलमय सूर... हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला... आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, तंजावरचे युवराज महाराज संभाजीराजे, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. डी. वाय. पाटील, अ‍ॅड. सिद्धार्थ धेंडे, प्रदीप रावत, समितीचे संस्थापक अमित गायकवाड, नामदेव शिरगावकर, दिलीप मोहिते, श्रीनाथ भिमाले, दिपकभाऊ मानकर, अरविंद शिंदे, भानुप्रताप बर्गे, सुनील मारणे यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊशहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, अ‍ॅड. प्रताप परदेशी, परागमामा मते, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. मिरवणुकीचे यंदा ६ वे वर्ष आहे.

मिरवणुकीत जिजाऊशहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुयार्जी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद््गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ सहभागी झाले होते.

शिवजयंतीला पुण्यात आगळावेगळा इतिहास घडला. महाराणा प्रताप, श्री शिवछत्रपती, छत्रसाल बुंदेले यांच्या मूर्ती असलेला शिवछत्रपती छत्रसाल बुंदेले महाराज स्वराज्यरथ दिमाखात सोहळ्यात मिरवत होता. भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणा-या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. शिवगर्जना ढोलताशा पथकाच्या जल्लोषपुर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. सोहळ्याचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ललित शिंदे, दिपक घुले, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, गिरीष गायकवाड, दिग्वीजय जेधे, शंकर कडू, महेश मालुसरे, निलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दिपक बांदल, किरण देसाई, मंदार मते, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले.

शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळयावर सकाळी महापौर मुक्ता टिळक, आमदार शशिकांत शिंदे, ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, पुष्पवृष्टीचे यंदा ७ वे वर्ष आहे.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj's great tribute to Sardar's descendants, helicopter to flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.